'राजकुमार, राजकुमार...', मांत्रिकाने म्हटला असा मंत्र! कुणी बेशुद्ध, कुणी रडतंय, कुणी किंचाळतंय; डॉक्टरांचे उपचारही फेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येने लोकांना बरं करतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून अनेक लोक त्याच्याकडे उपचारासाठी येतात. यावेळी त्याच्या ठिकाणी तंत्रविद्येसाठी आलेली मुलं अचानक बेशुद्ध झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली.
अश्वनी कुमार मिश्र, प्रतिनिधी/ लखनऊ : तंत्रमंत्र यावर कुणी विश्वास ठेवतं, कुणी नाही. विज्ञानाला मानणारे लोक तर याला मानतच नाही. असाच विज्ञानाचा अभ्यास करणारे डॉक्टरही एका मांत्रिकासंबंधी प्रकरणामुळे हैराण झाले आहे. एका गावात एका मांत्रिकाने खळबळ उडवली आहे. त्याने असा मंत्र म्हटला की गावातील मुलं बेशुद्ध आहेत. कुणी रडत आहेत, कुणी किंचाळत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचाराचा, औषधाचाही काही परिणाम होत नाही आहे. उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना आहे.
जालौनमधील पंडितपूर गावात एका तांत्रिकामुळे खळबळ उडाली आहे. तांत्रिक राजकुमार तिवारीने गावात इतकी दहशत पसरवली आहे की सगळेच चिंतेत आहेत. सुमारे अर्धा डझन मुलं बेशुद्ध आहेत आणि राजकुमार राजकुमार किंचाळत आहे. कुणी ओरडत आहे, तर कुणी रडत आहे. मुलं बेशुद्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली.
advertisement
नेमकं घडलं काय?
मुलांना बरं करण्याच्या नावाखाली तांत्रिकाने हे सर्व केल्याचा आरोप लोक करत आहेत. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येने लोकांना बरं करतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून अनेक लोक त्याच्याकडे उपचारासाठी येतात. यावेळी त्यांच्या ठिकाणी तंत्रविद्येसाठी आलेली मुलं अचानक बेशुद्ध झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली.
औषधांचाही परिणाम नाही, डॉक्टरही शॉक
view commentsघाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलांना दवाखान्यात नेलं. मुलांवर उपचार करताना डॉक्टरही चिंतेत दिसले. डॉक्टरांच्या औषधांचा मुलांवर काहीही परिणाम होत नाही. काहींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांची चिंता आणखी वाढली आहे. ग्रामस्थांनी आता जिल्हा प्रशासनाकडे तांत्रिकाची सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र गावातील तांत्रिकाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Location :
Uttar Pradesh
First Published :
August 07, 2024 9:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
'राजकुमार, राजकुमार...', मांत्रिकाने म्हटला असा मंत्र! कुणी बेशुद्ध, कुणी रडतंय, कुणी किंचाळतंय; डॉक्टरांचे उपचारही फेल


