नेमकं घडलं काय?
म्हापे एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाने आपले बूट पाऊस सुरू असल्याने केबिनच्या बाहेर काढले होते. त्याने पुन्हा बूट घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बुटात हालचाल जाणवली. तेव्हा त्याने बुटात पाहिले असता एक साप दिसला. यानंतर सुरक्षारक्षकाने ताबडतोब सर्पमित्र अक्षय डांगे यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. अक्षय यांनी सापाला पकडून जंगलात सोडून दिले. परंतु, बुटात असणारा साप सर्वात विषारी किंग कोब्रा असल्याचे लक्षात येताच सर्वांची घाबरगुंडी उडाली.
advertisement
आमदार-खासदारांची चंगळ, फक्त साडेनऊ लाखात मिळणार घर!
सर्वाधिक विषारी किंग कोब्रा
दरम्यान, किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. मुख्यतः भारत, दक्षिण-आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि फिलिपाइन्स भागात हा साप आढळतो. अत्यंत सतर्क आणि बुद्धिमान सापांपैकी एक म्हणून किंग कोब्राला ओळखलं जातं. एका दंशात किंग कोब्रा इतकं विष सोडतो की त्याच्यात एकाच वेळी 20 हत्तींना मारण्याची ताकद असते. त्यामुळेच किंग कोब्राला सापांच्या जगातील राजा मानलं जातं, आणि त्यामुळेच त्याला किंग कोब्रा नाव असल्याचं सांगितलं जातं.