एका फ्रिजची ही जाहिरात. एका घरातील फ्रिज विकायचा होता म्हणून सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे आणि 'फ्रिज फॉर सेल' असं लिहिण्यात आलं. अनेकांनी ही जाहिरात पाहिली पण या जाहिरातीच्या फोटोत फ्रिज कुठेच दिसेना.
सासू गुपचूप उघडायची सुनेचं पार्सल, महिलेने शिकवला धडा, ऑर्डर केली अशी वस्तू, संपूर्ण कुटुंब धक्क्यात
advertisement
तुम्हीसुद्धा फोटो नीट पाहा. एक किचन दिसतं आहे. पण किचनमध्ये फ्रिज मात्र कुठेच दिसत नाही आहे. फ्रिज विकायचा आहे पण तो आहे कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कितीतरी लोक फ्रिज शोधत आहेत. तुम्हीसुद्धा हा फोटो पाहाल तर गोंधळून जाल. यात फ्रिज नाहीच असं म्हणाल. पण जरा नीट पाहा. फ्रिज अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. दिसला का?
तुम्ही जे किचन पाहात आहात तोच संपूर्ण फ्रिज आहे. आता हे कसं? तर फोटो नीट पाहा. तुम्हाला दिसत असलेलं किचन तिथं नाहीच म्हणजे ते विरुद्ध दिशेला आहे जी बाजू तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्ही जे किचन पाहात आहात ते तुम्हाला फ्रिजमध्ये दिसत असलेलं किचनचं प्रतिबिंब आहे. म्हणजे हा फ्रिज अगदी आरशासारखा आहे. ज्यात किचन दिसत आहे. जेव्हा तुमचं लक्ष संपूर्ण किचनकडे न जाता किचनला विभागणाऱ्या मधल्या रेषेकडे जातं तेव्हा तुम्हाला फ्रिज दिसतो. कारण ही रेषा म्हणजे फ्रिजर आणि फ्रिज या भागाला वेगळी करणारी आहे.
आता तरी तुम्हाला किचन दिसलं का? @Vany_aagrahari युट्युब चॅनेलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत की फ्रिज शोधण्यातच वेळ गेला. तुम्हाला फ्रिज शोधण्यात किती वेळ लागला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.