TRENDING:

लग्न झालंय का तुझं? गप्पा मारता मारता आजीने AI नातीला विचारला प्रश्न, उत्तर काय VIDEO पाहाच

Last Updated:

Old Woman Talk With AI Video Viral : आजी आणि एआयच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बोलता बोलता आजीने एआय मॉडेलला तुझं लग्न झालंय का? असा टिपिकल प्रश्न विचारला. यावर एआय मॉडेलनेही उत्तर दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. काही लोक शिकण्यासाठी, काही आपल्या कामासाठी तर काही लोक विरंगुळा म्हणूनही एआयचा वापर करत आहेत. अशीच एक आजी जी एआयसोबत गप्पा मारताना दिसली. बोलता बोलता आजीने एआय मॉडेलला तुझं लग्न झालंय का? असा टिपिकल प्रश्न विचारला. यावर एआय मॉडेलनेही उत्तर दिलं आहे.
News18
News18
advertisement

आजी आणि एआयच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पोस्टमध्ये एक आजी खुर्चीत बसलेली दिसते. तिच्या हातात मोबाईल आहे. व्हिडीओला मोबाईलवाली नात असं कॅप्शन दिलं आहे. तर व्हिडीओवर या आजीला जमिनी नावाची नात सापडली, जेव्हा आजी जेमिनीला नातवंडांपेक्षा जास्त प्रश्न विचारते असं लिहिलं आहे. आता आजी आणि जेमिनीमध्ये नेमका काय संवाद सुरू आहे ते पाहुयात.

advertisement

पाकिस्तानात दूध उकळणं नको! वैतागलेल्या महिलेचा VIDEO VIRAL

जसं आजी मोबाईलवर एआय सुरू करते तसा समोरून आवाज येतो, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे, तुम्ही मला काहीही विचारू शकता किंवा माझ्याशी गप्पा मारू शकता. आजी सुरुवातीला सांगते गप्पा मारायच्या होत्या. नंतर विचारते काय विचारू? असं म्हटल्यानंतर तिचा पहिला प्रश्न गुडघे दुखत आहेत, तुझ्याकडे काही औषध आहे का? यावर एआय सांगतं माफ करा मी वैद्यकीय सल्ला देऊ शकत नाही. गुडघेदुखीवर उपाययोजनांसाठी तुम्ही नेहमी डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.

advertisement

पुढे आजी एआयला आपला वाढदिवस असल्याचं सांगतं. तेव्हा एआय तिला वाढदिवसच्या शुभेच्छा देतं आणि वाढदिवसाचा काही खास प्लॅन आहे का त्याबाबत विचारते. तेव्हा आजी सांगते स्वंयपाक केला, देवाची पूजा, केली, जप केला, असाच दिवस असतो माझा.  यावर एआय दररोज देवाची पूजा करणं, पोथी वाचणं हे चांगलं काम आहे, तुमचा दिवस कसा जातो. यावर आजी चांगला जातो असं सांगते. यावर एआय हे ऐकून बरं वाटलं असं म्हणतो.

advertisement

चीनमध्ये बसल्या बसल्या डॉक्टरने मुंबईतल्या रुग्णाची केली सर्जरी, भारतात पहिल्यांदाच झाली अशी सर्जरी

आता खरा उत्सुकतेचा प्रश्न. आजी विचारते, लग्न झालंय का तुझं? आता यावर एआयने काय उत्तर दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. एआय मॉडेल यावर सांगते मी एक मॉडेल आहे, मला लग्न करायची किंवा कुटुंब बनवायची गरज नसते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, 100 रुपयांत करा खरेदी,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

@anuradha_andhale इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे व्हिडीओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. बहुतेकांना आजीने एआय मॉडेलला लग्नाचा विचारलेला प्रश्न आवडला आहे. तर काहींनी लग्न न करता ती सुखी आहे, असं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
लग्न झालंय का तुझं? गप्पा मारता मारता आजीने AI नातीला विचारला प्रश्न, उत्तर काय VIDEO पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल