TRENDING:

Nostradamus Predictions 2024 : ज्याची भीती होती तेच घडतंय! 2024 सालाबाबत नास्त्रेदमसने केलेली भविष्यवाणी खरी ठरतेय?

Last Updated:

नास्त्रेदमस ज्याने केलेल्या भविष्यवाणींपैकी बऱ्याच भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. 2024 सालाबाबतही त्याने भयानक भविष्यवाणी केल्या होत्या. त्याने सांगितली तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं आता दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : नास्त्रेदमस ज्याने हजारो वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाणी केल्या होत्या. यात जर्मनीत हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येपर्यंतच्या घटनांचा समावेश आहे. नास्त्रेदमस यांनी केलेली ही भाकितं खरी ठरली आहेत. त्यांनी 2024 सालाबाबतही काही भविष्यवाणी केल्या होत्या. आताची परिस्थिती पाहता त्याच्या भविष्यवाणी खऱ्या ठरत आहेत का, अशीच भीती निर्माण झाली आहे.
नास्त्रेदमसनं 2024 सालाबाबत काय सांगितलं होतं?
नास्त्रेदमसनं 2024 सालाबाबत काय सांगितलं होतं?
advertisement

नास्त्रेदमस अनेक मोठ्या भविष्यवाणींसाठी ओळखला जातो. 2024 हे वर्ष जगासाठी कसं असेल हे त्यानं हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं. 2024 सालातील ती संकटांबाबत त्यांनी सांगितलं होतं. त्यातील दोन संकटं तर खरी ठरत आहेत असंच दिसत आहेत. यात युद्ध आणि महागाईचा समावेश आहे.

2024 मध्ये तिसरं महायुद्ध

नास्त्रेदमसनं 2024 सालात तिसरं महायुद्ध होईल असं म्हटलं होतं. आता इस्रायल-इराण युद्धाचा संबंध आता याच्याशीच जोडला जात आहे. या संपूर्ण लढ्यात एका बाजूला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारखे देश इस्रायलच्या सोबत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चीन आणि रशियासारखे देश त्यांच्याविरोधात आहेत.

advertisement

बापरे! अवकाशातून धरतीवर आला 'रहस्यमयी प्रकाश'; भारताच्या आकाशात दिसलं ते काय?

यामुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचा मोठा धोका निर्माण होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे लवकरच तिसरे महायुद्ध होऊ शकतं, असं मानलं जातं.

आर्थिक संकट

नॉस्त्रेदमसनं सांगितल्यानुसार 2024 मध्ये मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. परिस्थिती अत्यंत गोंधळाची होईल. 'गहू इतका महागेल की माणसं एकमेकांना खातील.  लोक या अंदाजाला युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाशीही जोडत आहेत. गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जगभरात गव्हाचा तुटवडा आहे. गव्हाच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे.

advertisement

चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते? कधीही पाहिलं नसेल असं रोमांचक दृश्य!

आकाशातून आगीचा वर्षाव

2023-2024 दरम्यान काहीतरी घडेल ज्यामध्ये आकाशातून आगीचा वर्षाव होईल, असं नास्त्रेदमसनं आपल्या भविष्यवाणीत लिहिलं होतं. त्याची ही भविष्यवाणी जगाच्या अंताचे संकेत देते.  यानुसार आगीच्या वर्षावामुळे संपूर्ण जग नष्ट होईल. काही लोकांचा असा अंदाज आहे की आकाशातून आगीचा वर्षाव झाला म्हणजे एका कालावधीचा अंत होईल आणि दुसरा कालावधी जन्म घेईल.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Nostradamus Predictions 2024 : ज्याची भीती होती तेच घडतंय! 2024 सालाबाबत नास्त्रेदमसने केलेली भविष्यवाणी खरी ठरतेय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल