रक्षाबंधनसाठी तुम्ही हटके मेहंदी डिझाइन शोधत असाल तर ही डिझाइन जबरदस्त आहे. ही मेहंदी खूप स्पेशल आहे. कारण यामुळे तुमच्या हातावर रंग तर चढेलच पण सोबतच तुम्हाला तुमच्या भावाकडून रक्षाबंधन गिफ्टही मिळेल. असं या मेहंदीत काय आहे ते पाहुयात.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हाताच्या मागच्या बाजूला काढलेली ही मेहंदी. एक क्युआर कोडसारखी ही डिझाइन. एक तरुणी हा मेहंदीचा क्युआर कोड मोबाईलमधील यूपीआय अॅपवरून स्कॅन करते आणि चक्क तो स्कॅन होतो. आता यात फक्त पैसे टाकायचे आणि पैसे ट्रान्सफर. सामान्यपणे रक्षाबंधनला प्रेझेंट पाकिटात पैसे टाकून ते बहिणीला ओवाळणी म्हणून दिले जातात. पण आता फक्त बहिणीने हा क्युआर कोडवाला मेहंदीचा हात पुढे करायचा तो भावाने स्कॅन करून त्यात पैसे टाकले की ती ओवाळणी बहिणीला गेली. ही डिजीटल मेहंदी आहे.
advertisement
Video: राखी फक्त बांधायची नाही तर नंतर खायची! पुणेकरांना खास पर्वणी
इन्स्टाग्रामवर यश_मेहंदी नावाच्या पेजवर डिजिटल मेहंदीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पण खरंच हे शक्य आहे का? तर नाही याच व्हिडीओत खाली ते स्पष्ट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी आहे. तो एडिट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
