Video: राखी फक्त बांधायची नाही तर नंतर खायची! पुणेकरांना खास पर्वणी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट करणारा सण. रक्षाबंधनासाठी बाजारात चॉकलेट राख्या दाखल झाल्या आहेत.
पुणे, 29 ऑगस्ट : रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट करणारा सण. हा सण उद्यावर आल्याने रंगबेरंगी आणि अनोख्या राखींनी बाजार गजबजले आहेत. सुपरमॅन, स्पायडरमॅन, परी, बॅट-बॉल, लाईट असलेल्या अशा विविध राख्या असताना आता बाजारात चॉकलेट राख्यांही दाखल झाल्या आहेत. त्यामुळे राख्यांचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्या चॉकलेट राख्या पुण्यातील सोमवार पेठेतील मूर्तीज बेकरीमध्ये मिळत आहेत.
कोणत्या राख्या उपलब्ध?
दरवर्षीप्रमाणे दोरा, रेशीम, लेस, मोती, मणी, रुद्राक्ष, कुंदन वापरून केल्या जाणाऱ्या राख्या आणि वेगवेगळे डिजाईन केलेल्या राख्या मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. अगदी दोन रुपयांपासून ते सोने, चांदी आणि हिऱ्याच्या राख्यांही घेतल्या जातात. परंतु यात थोडासा बदल म्हणून खाता येतील अशा चॉकलेटच्या राख्यांही बाजारात आल्या आहेत. यामध्ये टेडी बियर, विविध फुल, आईस्क्रीम चॉकलेट या राख्यांचा यामध्ये समावेश आहे.
advertisement
काय आहे किंमत?
गेले तीन वर्ष मी या संकल्पनेवर काम करत आहे. यंदा प्रथमच हव्या तशा राख्या बनल्या असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. यावेगळ्या राख्यांमुळे लहान मुल ही आवर्जून ते घेण्यासाठी येतात. या राख्या चार ते पाच दिवस उत्तम स्थितीत फ्रिजशिवाय टिकतात. भाऊ-बहीण अर्धीअर्धी करून वरचे चॉकलेट खाऊ शकतात. इतकेच नव्हे तर वरचे चॉकलेट खाल्ल्यावर उर्वरित राखी नेहमीच्या राखीप्रमाणे हवी तितके दिवस हातावर ठेवता येते. या राख्यांची किंमत 10 रुपयांपासून ते 50 रुपयेपर्यंत अशी माहिती चॉकलेट राख्या बनवणारे विक्रम मूर्ती यांनी दिली.
advertisement
कुठे करता येतील राख्या?
मूर्तीज बेकरी सोमवार पेठ पुणे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 29, 2023 7:26 PM IST








