या व्हिडिओमध्ये एक नाग एकाच वेळी दोन मोठी बेडकं गिळताना दिसतो, पण आपल्या क्षमतेपेक्षा मोठं शिकार केल्याने त्याची तब्येतच बिघडते आणि शेवटी त्याला उलटी करून बेडकं बाहेर काढावी लागतात. हा अंगावर काटा आणणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडिओत दिसतं की, पावसाळ्यात एखाद्या जंगलात किंवा दलदलीच्या भागात नागाला दोन मोठी बेडकं सहज शिकार म्हणून मिळतात. तो एका मागोमाग दोन्ही बेडकं गिळतो. पण लगेचच त्याची तब्येत खराब होते. बहुधा ही बेडकं त्याच्यासाठी खूप मोठी होती, ज्यामुळे तो त्यांना पचवू शकत नाही. काही वेळाने नाग दोन्ही बेडकं उलटी करून बाहेर काढतो.
advertisement
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका युजरने लिहिलं, "हे पाहून अंगावर काटा आला! नागाने एवढं लोभ करायला नको होतं." दुसऱ्याने मजेत लिहिलं, "नागाला वाटलं दोन बेडकं नाश्त्यात खाऊन टाकू, पण पोटानेच नकार दिला की, एवढं नाही पचणार!" काहींनी याला निसर्गाचा धडा म्हटलं, जो शिकवतो की प्रत्येक जीवाची मर्यादा असते. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून तो झपाट्याने व्हायरल होत आहे.
अजगर उलटी का करतो?
तज्ज्ञ सांगतात की नाग किंवा अजगरासारखे साप लवचिक जबड्यांमुळे मोठं शिकार सहज गिळू शकतात. मात्र, जर शिकार खूप मोठं असेल किंवा सापाची तब्येत ठीक नसेल, तर ते शिकार पचवू शकत नाहीत. अशा वेळी अजगर किंवा साप स्वतःला वाचवण्यासाठी आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी उलटी करतो. या घटनेतही दोन्ही बेडकांचा आकार किंवा त्यांच्या शरीरातून निघणारे काही रसायन नागासाठी हानिकारक ठरले असावेत, म्हणून त्याला बेडकं बाहेर टाकावी लागली.