याच जंगलात नुकताच एक 7 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला आहे. या निष्पाप चिमुकल्याचं आयुष्य वाघाच्या तोंडात संपलेलं ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.
ही घटना कशी आणि कुठे घडली?
छोटा कार्तिक सुमन आपल्या आजी आणि काकासोबत राजस्थानमधील रणथंभोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात दर्शनासाठी गेला होता. सगळं सुरळीत सुरू होतं. दर्शन झालं, भक्तगण परतीच्या वाटेवर निघाले. कार्तिक आपल्या आजीचा हात घट्ट पकडून चालत होता.
advertisement
अचानक, जंगलातील एका झाडीतून वाघ बाहेर आला आणि क्षणाचाही विलंब न करता थेट कार्तिकच्या गळ्यावर झडप घालतो. कोणालाही काही समजायच्या आत, वाघ त्याला उचलून झाडीत गायब होतो.
साक्षीदार सांगतात की वाघ पूर्णपणे तयार होऊन बसला होता. तो झाडीत शांतपणे लपून वाट पाहत होता. तो एखाद्या शिकारीसारखा, अगदी योग्य क्षणाची वाट बघत होता. जसा कार्तिक त्याच्या जवळ आला त्याने लगेचच संधी साधली.
ही घटना घडण्यापूर्वी आजीसोबत फिरायल आलेल्या कार्तिकने जंगलात फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला होता. त्याने दोन फोटो ही काही प्राण्यांसोबत काढले. एका फोटोत तो मोठ्या दगडासमोर उभा होता, तर दुसऱ्यात एका शांत बसलेल्या माकडाजवळ जाऊन तो बसला होता.
घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण बाघ काही सहजासहजी माघार घेत नव्हता. तो कार्तिकच्या मृतदेहाजवळ बराच वेळ बसून राहिला. शेवटी फटाके फोडून त्याला हुसकावलं लावलं आणि कार्तिकचा मृतदेह परत मिळाला.
पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. नियमाप्रमाणे प्रशासनाने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
चिमुकला कार्तिक
रणथंभोर नॅशनल टायगर रिझर्वमध्ये सध्या 70 पेक्षा जास्त वाघ आहेत, जे 300 चौ.किमीच्या जंगलात फिरत असतात. नेमकं ह्या पैकी कोणत्या वाघाने हल्ला केला हे कळू शकलेलं नाही, पण गणेश मंदिराच्या आसपास तीन वाघिणी दिसल्या त्यांच्यावरच फॉरेस्ट टिमला संशय आहे.
या घटनेनं कार्तिकच्या घरच्यांवर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे. एक आनंदी सहल अशाप्रकारे अश्रूंच्या कहाणीमध्ये बदलेल याची कोणी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल.