एका 50 वर्षीय महिलेला सुंदर दिसण्याचा खूप मोह होता. यासाठी तिनं तिचं घर विकलं. यातून आलेला पैसा तिनं सर्जरीसाठी घातला. मात्र याचा काही एक फायदा झाला नाही.
Viral News : बोअर झालं म्हणून चेहऱ्याची सर्जरी, 52 लाख केले खर्च; आता झाली भयानक अवस्था
कॅलिफोर्नियातील लेक टाहो येथील या महिलेने केवळ कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी अॅरिझोनामधील आपलं घर विकलं. स्त्रीला सुंदर आणि आकर्षक दिसायचं होतं, म्हणून तिनं फेसलिफ्ट घेण्याचा विचार केला. ही महिला ब्लॉगर असून तिचं नाव केली बीसले आहे. 50 वर्षांचे असल्यानं बीसलेचा चेहरा डल होऊ लागला होता. ज्याची ती खूप काळजीत होती. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी महिलेने फेसलिफ्ट करायचं ठरवलं.
advertisement
महिलेनं आपलं घर विकलं आणि 11.51 लाख रुपये खर्च करून फेसलिफ्ट केलं. बीसले म्हणाली की वयाच्या 48 व्या वर्षी त्यांचा चेहरा खूप घसरायला लागला होता आणि कोमेजायला लागला होता. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बीसले गेल्या 15 वर्षांपासून फिलर्स करून घेत होती. मात्र, त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही. त्यानंतर तिनं आपलं घर विकून प्लास्टिक सर्जरी करण्याचा विचार केला. महिलेनं तिचे तीन बेडरूमचं घर विकलं.
बीसलेनं प्लास्टिक सर्जरीसाठी अनेक सर्जनशी चर्चा केली. काही प्लास्टिक सर्जनने 41 लाख तर काहींनी 49 लाख रुपये खर्च सांगितला. मेक्सिकोतील तिजुआना येथे केवळ 11.51 लाखात प्लास्टिक सर्जरी केल्या जात होत्या. त्यामुळे बिस्लेनं तिथे जाऊन तिची प्लास्टिक सर्जरी करून घेतली. शस्त्रक्रियेनंतर बीसले आठवडाभर तिथेच राहिली. नंतर परत अमेरिकेत आली. बिस्ले त्याच्या नवीन लूकमुळे खूप खूश आहे, पण आता त्याला आपले घर विकून व्हॅनमध्ये राहावे लागत आहे.
