Viral News : बोअर झालं म्हणून चेहऱ्याची सर्जरी, 52 लाख केले खर्च; आता झाली भयानक अवस्था
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लोक काही गोष्टींपासून लवकर बोअर होतात. त्यामुळे त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा किंवा ती गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्ही कधी स्वतःच्या चेहऱ्यापासून बोअर झाल्याचं कोणाकडून ऐकलंय का?
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : लोक काही गोष्टींपासून लवकर बोर होतात. त्यामुळे त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा किंवा ती गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्ही कधी स्वतःच्या चेहऱ्यापासून बोअर झाल्याचं कोणाकडून ऐकलंय का? नसेल तर हे नक्की वाचा. एक तरुण स्वतःच्याच चेहऱ्यापासून बोर होतो. यासाठी तो स्वतःच्या चेहऱ्यावर काय काय करतो याविषयी जाणून घेऊया.
एक 26 वर्षीय तरुण आहे ज्याने आत्तापर्यंत आपल्या सर्जरीवर 52 लाख रुपये खर्च केले आहेत. तो 19 वर्षाचा असल्यापासून आपल्या चेहऱ्यावर सर्जरी करतो. यामागे कारण सांगताना तो म्हणाला की, मी माझ्याच चेहऱ्यापासून लवकर बोअर होतो.
advertisement
हा 26 वर्षीय तरुण इंग्लंडमधील मँचेस्टर येथे राहतो. तरुणाचं नाव लेवी झेड मर्फी आहे. लेवीनं नाकाची, ओठ फुगवणे, तोंडाची चरबी काढणे, अशा वेगवेगळ्या सर्जरी केल्या आहेत. लेवीनं एकून 15 सर्जरी केल्या आहेत. सर्जरी करणं त्याला आवडतं. तो त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
advertisement
लेवीनं नुकतीच एक सर्जरी केली. ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याची स्थिती खूपच वाईट झाली. त्याचा चेहरा सुजला. त्याला डोळं उघडणही अवघड झालं. याविषयी बोलताना लेवीनं म्हटलं, मी अजून रिकव्हर होत आहे. मला भिती आहे की, यामुळे माझा चेहरा खराब होईल.
दरम्यान, अशा सर्जरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र सर्जरी करणं बऱ्याचदा महागात पडतं. चांगला चेहरा अजूनच खराब होतो. लोक काहीह कारणावरुन सर्जरीच्या मागे लागतात. नंतर त्याचे भयानक परिणाम त्यांना भोगावे लागतात.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 03, 2023 11:59 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral News : बोअर झालं म्हणून चेहऱ्याची सर्जरी, 52 लाख केले खर्च; आता झाली भयानक अवस्था










