धाडस दाखवलं अन् दरवाजा केला बंद
क्षणात अश्विनी सावध झाल्या. त्यांनी निरखून पाहिलं, तर आत चक्क एक-दीड वर्षांची मादी बिबट्या बसली होती. काॅटखाली बसली होती. एका क्षणासाठी त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला, पण प्रचंड घाबरलेल्या असूनही त्यांनी हिंमत सोडली नाही. प्रसंगावधान दाखवत त्यांनी तात्काळ खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली आणि एका मोठ्या अनर्थ टळला.
advertisement
अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला
त्यांनी तातडीने घरच्यांना आणि त्यानंतर ग्रामस्थांना सावध केले. काही वेळातच कोकरूड पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे पकडणे हे एक मोठे आव्हान होते. वनपाल अनिल वाजे आणि त्यांच्या टीमने खोलीच्या दाराजवळ एक पिंजरा लावला आणि बिबट्याला बाहेर येण्यासाठी खोलीच्या खिडकीतून हुसकावण्यास सुरुवात केली. पिंजरा लावल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
त्यानंतर वनविभागाने बिबट्याला शिराळा येथील कार्यालयात नेले. तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली आणि तो पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. अश्विनी गोसावी यांच्या धाडसामुळे आणि समयसूचकतेमुळे हा बिबट्या जेरबंद झाला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे ही वाचा : दागिन्यांच्या पुडीत दगडं! 'त्या' दोघांनी लुटलं अनेक महिलांना; चोरीची पद्धत्त ऐकून पोलीस चक्रावले
हे ही वाचा : शिरपूरमध्ये आंदोलन पेटले! पोलीस निरीक्षकावर तीक्ष्ण हत्याराने वार; 8 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद