दागिन्यांच्या पुडीत दगडं! 'त्या' दोघांनी लुटलं अनेक महिलांना; चोरीची पद्धत्त ऐकून पोलीस चक्रावले
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या-दुकट्या महिला अन् वृद्धांना ते थांबवायचे. पोलीस असल्याचे सांगायचे. पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्या अंगावरील दागिने
वेंगुर्ले : रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या-दुकट्या महिला अन् वृद्धांना ते थांबवायचे. पोलीस असल्याचे सांगायचे. पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्या अंगावरील दागिने माझ्याकडे द्या. ते दागिने कागदाच्या पुडीत बांधत असल्याचे भासवायचे. पण प्रत्यक्षात मात्र हातचालाखी करत दागिन्यांऐवजी दगड-गोडे पुडीत बांधायचे. ती पुडी महिलांच्या हातात देऊन पसार व्हायचे.
एकाला सांगलीतून घेतलं ताब्यात
या घटनेसंदर्भात 4 ऑगस्ट रोजी वेंगुर्ला आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झालेले होते. पोलिसांनी यापूर्वी अबू तालील मुसा इराणी नावाच्या एका आरोपीला अटक केलेली होती. आता त्याचा साथीदार उनमत युसुफ इराणी (वय-32) याला सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने सांगलीतून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने पडकलं आरोपीला
उनमत युसुफ इराणी याला सांगली रेल्वे स्टेशनजवळी इराणी वस्तीतून मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. पुढच्या कारवाईसाठी त्याला वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
advertisement
हे ही वाचा : 'तो' रिक्षाचालक निघाला सुसाट; ठोकलं तिघांना अन् फरपटत नेलं महिला पोलिसाला; साताऱ्यात घडला थरार!
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीचा छेड काढली, मुलासह आईची तुरुंगात रवानगी झाली; पोस्को कोर्टाकडून महत्त्वाचा निकाल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
दागिन्यांच्या पुडीत दगडं! 'त्या' दोघांनी लुटलं अनेक महिलांना; चोरीची पद्धत्त ऐकून पोलीस चक्रावले