शिरपूरमध्ये आंदोलन पेटले! पोलीस निरीक्षकावर तीक्ष्ण हत्याराने वार; 8 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद

Last Updated:

शिरपूर तालुक्यात 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला होता. त्याच्या निषेध करण्याची काही तरूणांनी रास्तारोके आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यात वाहनांची गर्दी झाली. त्यावेळी...

Crime News
Crime News
धुळे : शिरपूर तालुक्यात 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला होता. त्याच्या निषेध करण्याची काही तरूणांनी रास्तारोके आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यात वाहनांची गर्दी झाली. त्यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आले. त्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावर मागून धारदार हत्यारांनी वार करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि शहरात वातावरण तापले.
मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पण...
सविस्तर माहिती अशी की, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाले होते. त्यासाठी आदिवासी संघटनांनी मूकमोर्चा काढला होता. हा खटला जलदगची न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी माहिती मोर्चेकऱ्यांनी पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांना दिली. त्यानंतर मोर्चा घेण्यात आला होता. पण अर्ध्या तासानंतर काही तरुणांकडून शिरपूर येथील गुजराती काॅम्प्लेक्ससमोर अचानक रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
advertisement
 पोलीस निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला
त्यावेळी पोलीस निरीक्षण जयपाल हिरे तिथे आले आणि आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्यबळाचा वापर करण्यात आला. त्याचेवळी हिरे यांच्यावर मागून धारदार हत्यारांनी वार करण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांना तातडीने शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. हल्लेखारांच्या शोधासाठी आता पोलिसांचे पथक रवाना झालेले आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
शिरपूरमध्ये आंदोलन पेटले! पोलीस निरीक्षकावर तीक्ष्ण हत्याराने वार; 8 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement