TRENDING:

Digital Condom : आता आला डिजिटल कंडोम! बाईsss हा काय नवा प्रकार; वापरायचा कसा?

Last Updated:

सध्या सोशल मीडियावर डिजिटल कंडोमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अ‍ॅज ईझी अ‍ॅज युजिंग अ रिअल कंडोम' अशा टॅगलाइनसह पहिल्या डिजिटल कंडोमची जाहिरात करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लैंगिक संबंध ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. लैंगिक संबंधांच्या माध्यमांतून होणाऱ्या रोगांपासून बचाव व्हावा आणि अनैच्छिक गर्भधारणा टाळता यावी यासाठी कंडोम वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सध्याच्या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे कंडोम उपलब्ध आहेत. सध्या सोशल मीडियावर डिजिटल कंडोमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अ‍ॅज ईझी अ‍ॅज युजिंग अ रिअल कंडोम' अशा टॅगलाइनसह पहिल्या डिजिटल कंडोमची जाहिरात करण्यात आली आहे. पण कंडोमचा नेमका प्रकार काय, तो वापरायचा कसा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
डिजीटल कंडोम
डिजीटल कंडोम
advertisement

लैंगिक आरोग्याशी संबंधित असलेल्या 'बिली बॉय' या जर्मन ब्रँडने या डिजिटल कंडोमची निर्मिती केली आहे. या कामात इनोसियन बर्लिन नावाच्या एजन्सीचंदेखील योगदान आहे. या डिजिटल कंडोमला 'कॅमडॉम अ‍ॅप' (CAMDOM App) असं नाव देण्यात आलं आहे.

काय आहे डिजीटल कंडोम?

अ‍ॅपचे डेव्हलपर फेलिप आल्मेडा (Felipe Almeida) एका निवेदनात म्हणाले, "आजकाल स्मार्टफोन्स हे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग बनले आहेत. आपण त्यावर भरपूर संवेदनशील डेटा साठवतो. तुमची परवानगी नसताना कंटेंट रेकॉर्डिंगपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही पहिलं अ‍ॅप तयार केलं आहे. हे अ‍ॅप ब्लूटूथ वापरून तुमचा कॅमेरा आणि माइक ब्लॉक करू शकतं."

advertisement

China Woman Pregnancy Age : चीनी महिला कोणत्या वयात मुलांना जन्म देतात?

लैंगिक संबंधांदरम्यान आपल्या पार्टनरला आपल्या परवानगीशिवाय व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करता येऊ नये, या उद्देशाने हा कंडोम डिझाइन करण्यात आला आहे. या कंडोमच्या मदतीने मोबाइल डिव्हाइस ब्लॉक करता येतं.

कसा वापरायचा डिजीटल कंडोम?

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अ‍ॅप रूपातला कंडोम वापरण्यासाठी युझर्सनी सेक्स करण्यापूर्वी आपापले स्मार्टफोन जवळ ठेवणं गरजेचं आहे. फोन शेजारी-शेजारी ठेवल्यानंतर 'ब्लॉक ऑल कॅमेराज आणि मायक्रोफोन्स' हे व्हर्च्युअल बटण खाली स्वाइप करावं लागेल. एखाद्या युजरने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजेल आणि ज्या व्यक्तीला रेकॉर्डिंगचा धोका असू शकतो, ती सावध होईल. हे अ‍ॅप एकाच वेळी शक्य तितकी उपकरणं ब्लॉक करू शकतं.

advertisement

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरताय? जाणून घ्या प्रकार आणि योग्य कोणते

इनोसियन बर्लिनचे सीसीओ गॅब्रिएल मॅटर (Gabriel Matter) म्हणाले, "आम्ही फक्त आमच्या क्लायंटच्याच नाही तर समाजाच्यादेखील समस्या सोडवतो. म्हणूनच बिली बॉयसोबत मिळून ॲप विकसित करणं महत्त्वाचं होतं. या ॲपमुळे युझर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा कोणताही कंटेंट लीक होणार नाही. अशा प्रकारे सर्व तंत्रज्ञान एकत्रित करण्याचा यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नव्हता."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

डिजिटल कंडोमची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युझरने विनोदी कमेंट करत म्हटलं आहे की, 'होल्ड ऑन बेबी इट्स अपडेटिंग' आणखी एकाने कमेंट केली, "शेवटी, फोन सेक्ससाठी एक सुरक्षित उपाय आला. मला 'आय लव्ह यू' व्हायरसपासून सुरक्षित राहायचं आहे." "हे फोन सेक्ससाठी आहे का?" असा प्रश्न एका युझरने कमेंट करून विचारला आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Digital Condom : आता आला डिजिटल कंडोम! बाईsss हा काय नवा प्रकार; वापरायचा कसा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल