अकाडेवारीनुसार भारतामध्ये 55% विवाहित लोक कधी ना कधी बेवफाई करतात, असं एका नव्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. हे सर्वेक्षण भारतातील पहिले एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ‘Gleeden’ ने केलं आहे. त्यांच्या इतर अभ्यासांतून देखील भारतात लग्न, नातेसंबंध आणि बदलती सामाजिक मूल्यं याविषयीचे दृष्टिकोन समोर आले आहेत.
या डेटाबेसनुसार, भारतात जेथे मुंबईसारखे शहर या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत, तिथे ‘इन्फिडेलिटी कॅपिटल ऑफ इंडिया’ हा किताब मात्र बेंगळुरूच्या नावावर गेलाय. 2020 साली Gleeden च्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 1.35 लाख बेंगळुरूकरांनी या अॅपवर रजिस्ट्रेशन केलं होतं, जे त्या वर्षीच्या 6 लाख एकूण युजर्सपैकी जवळपास 27% होते.
advertisement
यात 91,800 पुरुष आणि 43,200 महिला युजर्स होते. हे युजर्स दररोज सरासरी 1.5 तास चॅटिंगसाठी सक्रिय असायचे, विशेषतः दुपारी 12 ते 3 आणि रात्री 10 ते 12 दरम्यान, जर या वेळेला डिकोड केलं तर दुपारी लंच ब्रेक दरम्यान आणि रात्री जोडीदार झोपल्यानंतर ते चॅट करत असावे असा अंदाज आपण लावू शकतो.
या अॅपनं हे देखील सांगितलं की त्यावर पुरुष सहसा 24 ते 30 वयोगटातील महिलांना शोधत होते, तर महिला 31 ते 40 वयोगटातील अधिक वयाच्या पुरुषांकडे आकर्षित होऊन प्रामुख्याने व्हर्चुअल नात्यांमध्ये रस दाखवत होत्या.
इन्फिडेलिटी म्हणजे काय?
इन्फिडेलिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराशी असलेलं नातं तोडत, दुसऱ्या व्यक्तीसोबत भावनिक किंवा शारीरिक संबंध ठेवणं.
बेंगळुरूमध्ये वाढती व्यावसायिक धावपळ, तांत्रिक प्रगतता आणि वारंवार होणाऱ्या बिझनेस ट्रिप्स ही कारणं या शहराला ‘इन्फिडेलिटी कॅपिटल’ बनवतात, असं या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. बेंगळुरनंतर या यादीत मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि पुणे यांचा नंबर लागतो.