रेल्वे ट्रॅक ओलांडताना पिता-पुत्रांना जबर धडक बसली. या धडकेत ते उडून बाजूला पडले. हे दृश्य पाहू तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Viral News : डस्टबिनमध्ये सापडले 30 iphone, महिलेनं केलं असं काही की....
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालताना दिसत आहेत. लोकांच्या मागून एक ट्रेन कमी वेगाने येत आहे. ट्रेन लोकांच्या जवळ येताच एक माणूस मुलाला कडेवर घेऊन ट्रॅक ओलांडताना दिसत आहे. या व्यक्तीने मागे वळून न पाहता ट्रॅक ओलांडण्यास सुरुवात केली त्यामुळे समोरुन ट्रेन येत आहे हे त्याला समजलंच नाही. ट्रेन जवळ येताच त्याचं लक्ष जातं आणि तो मागे यायला पाहतो मात्र तोपर्यंत ट्रेन त्याला धडक देऊन जाते.
advertisement
या धडकेत मुलगा आणि वडिल दोन्ही दूर उडून प्लॅटफॉर्मवर पडतात. तिथे असलेले लोक त्यांच्या मदतीसाठी सरसवतात. पूर्ण निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. थोडासा उशीर झाला असता तर दोघेही गंभीर जखमी झाले असते किंवा त्यांना जीवही गमवावा लागला असता.
@idiotsInCamera नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.12 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक निष्काळजीपणामुळे संताप व्यक्त करत आहे. रेल्वे ट्रॅकवर लक्ष न देता चालल्यामुळे तुमच्यासोबत कधी दुर्घटना घडेल सांगू शकत नाही.
