Viral News : डस्टबिनमध्ये सापडले 30 iphone, महिलेनं केलं असं काही की....

Last Updated:

अनेकदा लोक गोष्टी विसरतात. कुठे काय ठेवलं आहे हे लवकर लक्षात येत नाही. अशी अनेक प्रकरणे समोर येतात. ज्यामध्ये लोक बाहेर कुठे गेल्यावर आपल्या महत्त्वाच्या, महागड्या गोष्टी विसरतात.

डस्टबिनमध्ये सापडले 30 iphone
डस्टबिनमध्ये सापडले 30 iphone
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : अनेकदा लोक गोष्टी विसरतात. कुठे काय ठेवलं आहे हे लवकर लक्षात येत नाही. अशी अनेक प्रकरणे समोर येतात. ज्यामध्ये लोक बाहेर कुठे गेल्यावर आपल्या महत्त्वाच्या, महागड्या गोष्टी विसरतात. अशा गोष्टी कोणाला सापडल्यावर काही लोक त्या प्रामाणिक पणाने माघारी देतात आणि काहीजण ते आपल्याकडेच ठेवतात. एक घटना सध्या समोर आली आहे ज्यामध्ये एका लहान मुलाला डस्टबिनमध्ये 30 आयफोन सापडले. पुढे काय घडलं आणि हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
डस्टबिनमध्ये 30 आयफोन सापडल्याची घटना समोर आली आहे. मध्य चीनमधील हेनान प्रांतातील ही घटना आहे. याठिकाणी रहिवासी असलेल्या चाई नावाच्या महिलेनं सांगितले की, तिच्या लहान भावाला दोन डस्टबिनमध्ये नवीन फोन सापडले आहेत. फ्लॅटमधून खाली येताना डस्टबीन पायऱ्यांवर ठेवलं होतं. फोन पाहून चाईचा भाऊ कचरा फेकत होता. या कचऱ्यात तिच्या भावाला फोन सापडले.
advertisement
ताबडतोब चाय यांनी पोलिसांना कॉल केला आणि त्यांनी मिळून 30 आयफोन काढले. साऊथ चायना मॉर्निंग यांनी याविषयी पोस्ट दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला. यानंतर समोर आलं की, एका डिलिव्हरी बॉयनं हे आयफोन डस्टबिनवर ठेवले होते. तो चुकून हे बॉक्स डस्टबिनवरच विसरुन गेला. यामध्ये 30 नवीन iPhone 14 Pro मॉडेल होते. बाकीचे बॉक्स ठीक करत असल्याने त्याने हा बॉक्स तिथेच ठेवला. पण त्यांला परत घ्यायला विसरला.
advertisement
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही मिळाली. यामध्ये दिसत आहे की, डिलिव्हरी बॉय हे बॉक्स इथे विसरला. त्यानंतर एक सफाई कामगार महिला आली तिथे आली. महिलेनं सर्व फोन डस्टबिनमध्ये टाकले. आणि फक्त पुठ्ठे घेऊन गेली. त्या महिलेला हे आयफोन असल्याचं समजलंच नाही. तिनं न उघडताच ते डस्टबिनमध्ये फेकलं.
advertisement
दरम्यान, आयफोन सापडलेल्या महिलेनं लगेच पोलिसांना माहिती दिल्यानं लोक महिलेचं कौतुक करत आहेत. प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे लोक महिला आणि तिच्या भावाचे कौतुक करतायेत.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral News : डस्टबिनमध्ये सापडले 30 iphone, महिलेनं केलं असं काही की....
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement