Viral News : सुट्टीसाठी आजीकडे गेला अन् घडलं असं काही की मुलाला गमवावा लागला जीव
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
घरात मच्छरांचा वावर हमखास असतो. आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तरी बऱ्याच ठिकाणी मच्छर चावतात. एक मच्छर खूप धोकादायक ठरु शकतो.
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : घरात मच्छरांचा वावर हमखास असतो. आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तरी बऱ्याच ठिकाणी मच्छर चावतात. एक मच्छर खूप धोकादायक ठरु शकतो. मात्र मच्छराच्या चाव्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो याविषयी कधी ऐकलंय का? समोर आलेल्या एका घटनेत मच्छराच्या चाव्यामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
मच्छराच्या चाव्यामुळे 14 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. हे प्रकरण युरोपमधून समोर आलं असून घटनेवं सर्वत्र खळबळ माजवली आहे. ही घटना चर्चेत येताच लोकांच्या मनात भितीचं वातावरण झालं आहे.
14 वर्षांचा मॅटेओ शिऊ त्याच्या पालकांसोबत युरोपमध्ये राहत होता. इटलीमध्ये त्यांचं घर होतं. तो सुट्टीसाठी त्याच्या आईसोबत ब्राझीलला गेला होता. आजीच्या घरी मॅटेओने कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला. पण इथे त्याला डास चावला. तो सामान्य डासांपेक्षा वेगळा होता आणि मॅटेओला त्रास देऊ लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा धक्का बसला आहे कारण अशा अपघाताची कोणालाच अपेक्षा नव्हती.
advertisement
सिंह, बिबट्या, मगरी यांसारख्या प्राण्यांना आपण घाबरत असू, पण मानवी जीवनासाठी सर्वात घातक म्हणजे डास. याआधीही काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये डासांमुळे पसरणाऱ्या संसर्गामुळे लोकांचं आरोग्य बिघडलं. डास चावल्यामुळे वेगवेगळे आजार झाले याविषयी अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.
advertisement
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो मच्छरांचा वावर कायमच असतो. डासांमुळे तुम्ही शांत बसू शकत का झोपू शकत नाही. ते सतत कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे गुनगुनत असतात. मग काय त्यांच्या चाव्यामुळे ते रक्त पितात आणि शरिराला खाज सुटते आणि कधी कधी हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. यातून वेगवेगळे आजार बळावतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 04, 2023 9:12 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral News : सुट्टीसाठी आजीकडे गेला अन् घडलं असं काही की मुलाला गमवावा लागला जीव









