लहान मुलगा वॉशिंगमशीनच्या ड्रायरमध्ये अडकला. त्याच्या किंचाळण्याचा आवाज आल्यावर महिला धावत त्याच्याकडे गेली. मुलाला वॉशिंगमशीनमध्ये अडकल्याचं पाहून महिला घाबरली. तिनं मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा प्रयत्न अपयशी ठरला. मग तिनं आपत्कालिन विभागाला कॉल केला. अग्मिशामक दलाचे जवान तिथे पोहोचले. तास भर प्रयत्न केल्यानंतर त्यांनी चिमुकल्याची सुटका केली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
advertisement
कुत्रा थेट वाघाशीच भिडला, चकमकीचा VIDEO व्हायरल
डेली मिररने याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अग्निशामक दलाच्या जवानांनी वॉशिंग मशीन पूर्णपणे खोलून मुलाची सुटका केली. मुलगा अशा प्रकारे वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये अडकला होता की, त्याचे फक्त हात आणि पाय वर दिसत होते. डोकं खाली अडकलं होतं. त्यामुळे त्याला बाहेर काढायला अजून थोडासा जरी उशीर झाला असता तरी त्याचा जीव गेला असता. सुदैवानं त्याला योग्य वेळी बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना पहायला मिळत आहे. यापूर्वीही अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये चिमुकले खेळता खेळता अडचणीत सापडले.
