TRENDING:

साप वारंवार जीभ का बाहेर काढतो? 90% लोकांना माहीत नसेल, त्यामागचं वैज्ञानिक कारण...

Last Updated:

साप वारंवार जीभ बाहेर-आत काढताना दिसतो. अनेकांना ही रागाची किंवा भीतीची भावना वाटते, पण प्रत्यक्षात साप आजूबाजूचा परिसर समजून घेण्यासाठी याचा वापर करतो. सापाला नाक असले तरी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपण साप पाहिला की, तो वारंवार जीभ बाहेर-आत काढताना दिसतो. अनेकांना हा प्रकार पाहून भीती वाटते, तसाच साप रागावलाय असेही वाटते. प्रत्यक्षात, सापाचे हे जरासुद्धा रागाचे लक्षण नसून आजूबाजूचा परिसर समजून घेण्यासाठी जीभ वापरतो.
Snake tongue function
Snake tongue function
advertisement

सुगंध टिपणारी ‘फर्क’ जीभ

सापाला नाक असले तरी सुगंधाची खरी अनुभूती त्याच्या दुहेरी (दुहेरी फडक्यांची) जिभेनेच होते. जीभ बाहेर काढल्यावर हवेतले सुगंधकण ती जमा करते. त्यामुळे कोणी जवळ आहे, एखादे सावज आहे की धोका आहे, हे साप आधीच ओळखतो, आपण त्याला पाहण्याआधीच, त्याला हे कळतं.

‘जॅकब्सन अवयव’कडे संदेश

सापतज्ज्ञ डॉ. डी. एस. श्रीवास्तव यांचे सांगणे आहे की, साप मुळात निरुपद्रवी प्राणी आहे; तो विनाकारण हल्ला करत नाही. जीभ बाहेर काढून तो आजूबाजूला असलेले कंपने आणि सुगंध टिपतो. ही जीभ तो तोंडातल्या विशेष ‘जॅकब्सन अवयवा’कडे नेतो. हा अवयव ते संदेश सापाच्या मेंदूपर्यंत पोहोचवतो, शिकार, शत्रू वा काही अन्य वस्तू, सर्व माहिती क्षणार्धात मिळते.

advertisement

कंपनेही सहज जाणवतात

सापाला जमिनीमधून येणाऱ्या अतिसूक्ष्म कंपनांची जाणीव त्वचा आणि हाडांमार्फत होते. प्राणी किंवा माणूस चालण्याने निर्माण होणारे हलकेच कंप सापाच्या मेंदूपर्यंत पोहोचते. त्यामुळे न पाहता-ऐकता त्याला आजूबाजूची घडामोड कळते. म्हणून, पुढच्या वेळी सापाला जीभ बाहेर काढताना पाहिलात तर घाबरू नका. तो आपल्याला पाहत किंवा ऐकत नसून ‘सुगंध’ आणि ‘कंपने’ ओळखत आहे. शांत राहा, त्रास देऊ नका; सापही आपल्याला हानी पोहोचवणार नाही.

advertisement

हे ही वाचा : लक्षात ठेवा! बेडरूममधील 'या' एका चुकीमुळे नात्यात येतो दुरावा आणि घरात येतात आर्थिक अडचणी

हे ही वाचा : भारतातील 'ही' 5 खतरनाक राज्यं, जिथे सर्वाधिक बायकांनीच केलीय नवऱ्याची हत्या; यात महाराष्ट्राचा नंबर कितवा?

मराठी बातम्या/Viral/
साप वारंवार जीभ का बाहेर काढतो? 90% लोकांना माहीत नसेल, त्यामागचं वैज्ञानिक कारण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल