TRENDING:

Indian Railway : पांढरा रंग लवकर खराब होतो, तरी भारतीय रेल्वे प्रवाशांना याच रंगाची चादर आणि उशी का देते?

Last Updated:

लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी, रेल्वेच्या काही श्रेणींमध्ये उशा आणि चादर दिले जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का ही या उशा आणि चादरी या पांढऱ्या रंगाच्या का असतात?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशभरात कुठेही लांबचा प्रवास करायचा झाला तर भारतीय रेल्वे हा सर्वात चांगला पर्याय आहे. हा प्रवास सुखाचा, सर्वांना परवडणारा आणि आरामाचा असतो. शिवाय रेल्वे ठराविक वेळेत आपल्याला आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवते. लोक आपल्या खिशाला परडवडेल अशा श्रेणीची तिकीट काढून प्रवास करतात. ज्यामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्व लोक यातून प्रवास करतात.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी, रेल्वेच्या काही श्रेणींमध्ये उशा आणि चादर दिले जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का ही या उशा आणि चादरी या पांढऱ्या रंगाच्या का असतात?

लोक शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू घ्यायला घाबरतात कारण ते लगेच खराब होतात. प्रवासात तर लोक पांढरे कपडे घालतच नाहीत. मग अशावेळी रेल्वे पांढरे कपडे किंवा चादरी का देते? पांढरी चादर लवकर खराब दिसते. मग असं असलं तरी रेल्वे असं का करते? तुमच्या मनात देखील असाच प्रश्न आला असेल, तर चला आपण यामागील कारण समजून घेऊ.

advertisement

खरंतर हे ट्रेनमधील बेडरोल आणि पिलो कव्हर, तसेच चादर दररोज धुतले जातात आणि ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला ते फ्रेश दिले जातात.

भारतीय रेल्वे दररोज अनेक गाड्या चालवते, ज्यासाठी दररोज अनेक हजार बेडशीट आणि उशांचा वापर करावा लागतो. हे प्रवासाच्या वेळी डब्यांमध्ये प्रवाशांना पुरवले जाते आणि साफसफाईसाठी एकाच वापरानंतर गोळा केले जाते. साफसफाईच्या प्रक्रियेमध्ये 121 अंश सेल्सिअस तापमानात वाफ निर्माण करणाऱ्या मोठ्या बॉयलर मशीन्समध्ये हे कपडे टाकून साफ केले जाता. बेडशीट पूर्णपणे निर्जंतुकीकरण झाल्याची खात्री करण्यासाठी 30 मिनिटांसाठी या वाफेमध्येच कपडा ठेवला जातो.

advertisement

या तीव्र साफसफाईच्या प्रक्रियेमुळे भारतीय रेल्वेने रंगीत चादरीपेक्षा पांढऱ्या चादरींना प्राधान्य दिले आहे. अशा कठोर वॉशिंग परिस्थितीसाठी पांढरी बेडशीट अधिक योग्य असल्याचे आढळले आहे. ते ब्लीचिंगला चांगला प्रतिसाद देतात, अशावेळी रंगीत कपडे वापरले तर त्यांचा रंग उडून त्या खराब दिसतात.

याउलट, पांढऱ्या चादरींना प्रभावीपणे ब्लीच केले जाऊ शकते, त्यांची चमक टिकवून ठेवता येते आणि वारंवार धुतल्यानंतरही फॅब्रिक स्वच्छ, चमकदार दिसते. पांढऱ्या बेडशीटची निवड करून, भारतीय रेल्वे प्रवाशांना प्रदान केलेले तागाचे कपडे केवळ निर्जंतुक नसून ते दिसायलाही आकर्षक आहेत याची खात्री करते.

advertisement

त्याशिवाय, वेगवेगळ्या रंगांच्या चादरी वापरून, रंग एकमेकांना लागण्यापासून रोखण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे धुवावे लागेल. अशावेळ चादरी एकत्र धुतल्यास रंग दुसऱ्या चादरींना लागू शकतो, अशाने त्या खराब होतील, यामुळे देखील पांढऱ्या रंगाच्याच चादरी आणि उशांचे कवर वापरले जातात.

मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : पांढरा रंग लवकर खराब होतो, तरी भारतीय रेल्वे प्रवाशांना याच रंगाची चादर आणि उशी का देते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल