TRENDING:

भारतीय विद्यार्थी ईरानला कोणतं शिक्षण घेण्यासाठी जातात? मुस्लीम देशातील कॉलेज किती चांगले?

Last Updated:

उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अडकलेले 100 हून अधिक भारतीय विद्यार्थी बुधवारी भारतात परत आणण्यात आले. त्यामध्ये काश्मीरच्या 90 विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या इजरायल आणि ईरानमधील संघर्षामुळे संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचं वातावरण आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ईरानमध्ये शिकायला गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी संकटात सापडले आहेत. काही विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडे विनंती केली आहे की, त्यांना लवकरात लवकर युद्धग्रस्त भागातून बाहेर काढावं. उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अडकलेले 100 हून अधिक भारतीय विद्यार्थी बुधवारी भारतात परत आणण्यात आले. त्यामध्ये काश्मीरच्या 90 विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

विद्यार्थी का जातात ईरानमध्ये शिकायला?

दरवर्षी जवळपास 20,000 ते 25,000 भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. यामध्ये काही विद्यार्थी ईरानचा पर्याय निवडतात. 2022 मध्ये, परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार सुमारे 2050 भारतीय विद्यार्थ्यांनी ईरानमधील विविध कोर्सेससाठी प्रवेश घेतला होता.

ईरानमध्ये शिक्षणाचं सर्वात मोठं कारण म्हणजे किफायतशीर शिक्षण आणि मेडिकल कोर्सेसची उपलब्धता. भारतात खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण 80-90 लाखांपर्यंत जातं. पण ईरानमध्ये हे शिक्षण फक्त 18-25 लाखांमध्ये पूर्ण होतं. इथे Doctor of Medicine (MD) ही डिग्री दिली जाते, जिला भारतात एमबीबीएससाठी चांगलं मानलं जातं.

advertisement

भारतामध्ये दरवर्षी जवळपास 23 लाख विद्यार्थी NEET परीक्षा देतात, पण मेडिकल सीट्स फक्त सव्वा लाखच असतात. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही आणि ईरानसारखा परदेशी पर्याय निवडावा लागतो. ईरानमध्ये शिक्षण घेण्यासाठी NEET पास असणं आवश्यक असतं.

मेडिकल व्यतिरिक्त, काही विद्यार्थी इंजिनीयरिंग शिक्षणासाठीही ईरानमध्ये जातात. शरीफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित संस्थांमध्ये भारतीय विद्यार्थी शिकतात.

advertisement

याशिवाय, फारसी भाषा, साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राजकारण आणि इस्लामिक स्टडीज मध्ये रस असलेले विद्यार्थीही इथे शिक्षण घेतात. मात्र, यासाठी फारसी भाषा येणं आवश्यक असतं.

ईरान सरकार आणि काही धार्मिक संस्था भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. त्याशिवाय, भारत सरकारही ICCR आणि ITEC प्रोग्रामद्वारे मदत करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च झेपतो.

ईरानमध्ये तहरान, इस्फहान, शिराज या शहरांमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतं. फारसी ही तिथली मुख्य भाषा असून, काही कोर्ससाठी ही भाषा शिकावी लागते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
भारतीय विद्यार्थी ईरानला कोणतं शिक्षण घेण्यासाठी जातात? मुस्लीम देशातील कॉलेज किती चांगले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल