पश्चिम बंगालमध्ये एका महिला ट्रेन ड्रायव्हरचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. एस. के. मंडल आणि त्यांच्या असिस्टंट महाराणी कुमारी मालदा स्टेशनवरून महिपाल रोड रेल्वे स्टेशनला रिकामी ट्रेन आणण्यासाठी इंजिन घेऊन जात होत्या. संध्याकाळी 6.40 वाजता महाराणी यांनी वॉथरूम ब्रेक घेतला. त्या स्टेशन इमारतीतील शौचालयात जाण्यासाठी इंजिनमधून उतरल्या आणि रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे गेल्या.
advertisement
Alert! 38000 किमी वेगाने येतंय संकट, भारतातील शहरं धोक्यात, सगळं काही उद्ध्वस्त होणार
त्या परत येत होत्या तेव्हा दुसऱ्या बाजूने नवद्वीप धाम एक्सप्रेस वेगाने येत होती. गाडीचा वेग ताशी 100 किमी होता. पण वळण असल्याने ट्रेन दिसली नाही आणि काही कळायच्या आत ट्रेनने त्यांना उडवलं. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. इंजिनमध्ये शौचालयाची सोय नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप लोको पायलट्स असोसिएशनने केला आहे. देशभरातील सुमारे 2000 महिला रेल्वे ड्रायव्हर्ससह अनेक कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य सुविधांची मागणी केली आहे.
'ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन'चे शाखा अध्यक्ष रवी रंजन यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसंच सर्व इंजिनांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत अशी मागणी होत आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लोकोपायलट्ससाठी ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटची सुविधा नाही. रिपोर्ट्सची आकडेवारी बघितली तर फक्त 97 ट्रेन लोकोमोटिव्हमध्ये टॉयलेटची (Toilet) सुविधा उपलब्ध आहे. एवढंच नव्हे तर अनेक स्थानकांवर रनिंग रुममध्येही महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहं नाहीत. रनिंग रूम म्हणजे लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट आणि माल गार्ड यांच्यासह कर्मचारी त्यांच्या होम स्टेशनशिवाय इतर स्टेशनवर ड्युटीच्या वेळेनंतर किंवा शिफ्ट दरम्यान विश्रांती घेतात ती खोली होय.
Mahakumbh 2025 : आश्चर्यम! महाकुंभच्या चेंगराचेंगरीत मृत्यू, तेराव्याला जिवंत, कसा झाला चमत्कार?
ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट नसल्यामुळे महिला ड्रायव्हर सॅनिटरी नॅपकिन्स (Sanitary Napkins ) वापरतात. काही महिला पाणी पिणं कमी करतात. काही महिला अपुऱ्या सुविधांना कंटाळून त्यांच्या स्वप्नांशी तडजोड करतात आणि ऑफिसमध्ये काम करण्याची ड्यूटी स्विकारतात. पुरुषांसाठीही अनेक सुविधांचा अभाव आहे; पण महिला चालकांना मासिक पाळीच्या काळात जास्त अडचणी येतात, त्यामुळे बहुतांश महिला पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतागृहांच्या अभावामुळे सुट्टी घेणं पसंत करतात.