श्रीमंतांच्या घरात एक बार काउंटर असतो. त्यात वेगवेगळ्या प्रकारची महागडी, विदेशी दारू संग्रही असते. अशीच एक स्टेटस सिम्बॉल समजली दारू म्हणजे व्होडका होय. जगात अशी एक व्होडका आहे, की जिची खरेदी करायची असेल, तर कितीही श्रीमंत व्यक्तीही हजार वेळा विचार करते. ही व्होडका निवडक देशांमध्येच मिळते. या व्होडकाविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
द बिलिनेयर व्होडका हे जगातलं सर्वांत महागडं मद्य आहे. ही व्होडका निवडक देशांमध्येच मिळते. श्रीमंत व्यक्तीदेखील ही खरेदी करण्यापूर्वी खूप विचार करतात. अर्थात तिची वैशिष्ट्यंदेखील तशीच आहेत. श्रीमंत व्यक्ती या व्होडकाचा वापर खास इव्हेंटलाच करतात. व्होडका संपल्यानंतर तिची बाटली फेकून न देता ती शोपीस म्हणून घरात ठेवतात. या व्होडकाचं पॅकिंग अत्यंत खास असतं. या महागड्या व्होडकाची बाटली अत्यंत महाग हिऱ्यांनी सजवलेली असते. त्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसते. या व्होडकाच्या पॅकिंगवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, असं कंपनीने सांगितलं आहे.
द बिलिनेयर व्होडकाची किंमत खूप जास्त आहे. या व्होडकाची एक बाटली सुमारे 3.7 दशलक्ष डॉलर्स किमतीला आहे. भारतीय चलनानुसार विचार केला तर या व्होडकाची किंमत सुमारे 30 कोटी 77 लाख रुपये होते. लियोन वेअर्स नावाची कंपनी द बिलिनेयर व्होडकाची निर्मिती करते. केवळ ही व्होडकाच महाग नाही, तर तिची बाटलीदेखील बहुमूल्य असते. कारण ती हिरेजडित असते. ही व्होडका तयार करण्याची प्रक्रिया खूप खास आहे. एका वृत्तानुसार, ही व्होडका तयार करण्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे जगातलं सर्वोत्तम आणि अत्यंत स्वच्छ असतं. त्यासाठीचं पाणी कोट्यवधी रुपयांच्या हिऱ्यांनी स्वच्छ केलं जातं. ही व्होडका बनवण्याची रेसिपीही गुप्त ठेवण्यात आली आहे, जेणेकरून इतर कोणत्याही कंपनीने त्या रेसिपीची चोरी करू नये.