श्री गंगानगर येथील दशमेश कॉलनीतील एका घरात उझबेकिस्तानमधील तरुणी ये-जा करत असे. या घरात महाराष्ट्र, दिल्ली-हरियाणातील मुलीही दिसल्या. याबाबत पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. पोलिसांच्या पथकाने घरावर छापा टाकला.
या घरात काय सुरू होतं?
श्रीगंगानगरचे सीओ सिटी बी. आदित्य यांनी सांगितलं की, दशमेश कॉलनीतील वॉर्ड क्रमांक 11 मध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत तक्रारी येत होत्या. एसपी गौरव यादव यांच्या सूचनेवरून पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. सीओ सिटी बी आदित्य, सेतिया चौकीच्या प्रभारी सुशीला मीना आणि पुरानी आबादी पोलीस ठाण्याचे प्रभारी गोविंद सिंग चरण यांच्यासह पोलीस दलाने छापा टाकला.
advertisement
घरातून गायब झाली मुलगी, पोलिसांनी शोधून काढलं; तरी झाले निलंबित, पण का?
छापा टाकण्यापूर्वी पोलीस बनावट ग्राहक म्हणून घरात घुसले. करार निश्चित होताच, बनावट ग्राहकाने पोलिसांना कारवाई करण्याचे संकेत दिले. यानंतर पोलिसांनी छापा टाकला. इथं वेश्या व्यवसाय सुरू होता. श्रीगंगानगर पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
8 जणांना अटक
वेश्या व्यवसाय करणाऱ्या चालकासह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यामध्ये उझबेकिस्तानच्या एका महिलेचाही समावेश आहे. याशिवाय राजस्थानसह अन्य राज्यातील महिलांनाही पोलिसांनी पकडलं आहे. सीओ सिटी बी आदित्य यांनीही सांगितले की, अटक केलेल्या मुलींचं वय 19 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 45 हजार रुपयांची रोकडही जप्त केली.
डॉक्टरला हृदय देऊन बसली तरुणी; 8 वर्षांत 10 वेळा असं काही घडलं की, पोलीसही हैराण
सध्या या प्रकरणी श्रीगंगानगरच्या महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती नायक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
