डॉक्टरला हृदय देऊन बसली तरुणी; 8 वर्षांत 10 वेळा असं काही घडलं की, पोलीसही हैराण

Last Updated:

एक तरुणी एका डॉक्टरच्या प्रेमात पडली.  गेली 8 वर्षे ते अगदी पती-पत्नीसारखं आयुष्य जगलं. पण शेवटी डॉक्टरनं असं कृत्य केलं की तरुणीने पोलिसात धाव घेतली आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
सुमित शर्मा, प्रतिनिधी/ लखनऊ : प्रेम कधी, कुठे, कसं, कुणावर होऊ सांगू शकत नाही. असंच एक प्रेमप्रकरण चर्चेत आलं आहे. एक तरुणी एका डॉक्टरच्या प्रेमात पडली.  गेली 8 वर्षे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अगदी पती-पत्नीसारखं आयुष्य जगलं. पण शेवटी डॉक्टरनं असं कृत्य केलं की तरुणीने पोलिसात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.
हाथरसमधील नराधम डॉक्टर, संतोष दीक्षित असं त्याचं नाव. त्याने आपल्या बहिणीची फसवणूक करून तिचं शारीरिक शोषण केलं, अशी तक्रार त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या तरुणीच्या बहिणीने पोलिसात केली आहे.
तरुणीच्या तक्रारीनुसार, ती तिच्या बहिणीसोबत राहते. संतोष तिच्या बहिणीला भेटायला जायचा. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. गळ्यात हार घालून दोघांनी मंदिरात विवाह केला. जेव्हा-जेव्हा तरुणीला संतोषला सांगितलं की तिला हिंदू रितीरिवाजांनुसार त्याच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा तो तिला मारहाण करायचं. लोक काय म्हणतील या भीतीनं तिनं कुणाला सांगितलं नाही.
advertisement
शारीरिक अत्याचार आणि गर्भपात
संतोष तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता. तो डॉक्टर असल्याने जेव्हा ती गरोदर राहायची तेव्हा तो तिला औषध देऊन गर्भपात करायचा. त्याने 10 वेळा तिचा गर्भपात करवून घेतला. संतोषने पीडितेकडून 8 लाख रुपये आणि तिच्या मोठ्या बहिणीचे सुमारे 35 ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्या व्यवसायासाठी आणि इतर गरजांसाठी घेतले आहेत. परत मागितल्यावर तो मारहाण करत असे.
advertisement
याप्रकरणी हसयान येतील गुजरपूर पोलीस टाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेला योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, अद्याप तरुणाला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
डॉक्टरने प्रायव्हेट पार्टवर गोंदवायला लावलं स्वत:चं नाव, तिघींवर लैंगिक अत्याचार
2023 साला मुंबईत घडलेली ही घटना.  तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली मुंबईतल्या मालवणी भागातल्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली होती. योगेश सुनील भद्र भानुशाली असं या डॉक्टरचं नाव. 21 वर्षीय तरुणीने डॉक्टरबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली, यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डॉक्टर भानुशालीवर 21 ते 24 वर्ष वयाच्या आणखी दोन महिलांनी आरोप केले. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलांनी डॉक्टरवर केला आहे.
advertisement
आरोपी डॉक्टरने पीडितेच्या शरिरावर त्याचं नाव गोंदवून घेतलं आणि लग्नाचे वचन देऊन त्यांच्यासोबत हेराफेरी केली, असा दावा वकिलाने केला आहे. एका पीडित तरुणीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर डॉक्टरचं नाव गोंदवून घेतल्याचंही वकिलांचं म्हणणं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
डॉक्टरला हृदय देऊन बसली तरुणी; 8 वर्षांत 10 वेळा असं काही घडलं की, पोलीसही हैराण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement