जास्त व्ह्यूज आणि लाईक्ससाठी तरुणीनं चक्क स्मशभूमीत जाऊन व्हिडीओ बनवला. ती तिथे साफसफाई करण्यासाठी गेली. स्मशानभूमीत जाऊन तिनं डेकोरेशन केलं. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही प्रश्न पडेल की मध्यरात्री स्मशानभूमीची साफ सफाई करण्यासाठी कोण जातं?
तरुणीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी स्मशानभूमीत आहे. तिचं म्हणणं आहे की, कोणालाही स्वच्छ जागेत झोपण्याचा अधिकार आहे. वेगवेगळ्या केमिकलचा वापर करत ती स्मशानभूमी साफ करताना दिसली. स्वच्छता करण्याच्या मधे ती कपकेक खात आहे.
advertisement
_the_clean_girl नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून अनेकांनी या व्हिडीओवर विविध कमेंट केले आहेत. अनेकांनी स्मशानभूमीत असं काम केल्याविषयी संताप व्यक्त केला तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या.
दरम्याम, सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि चर्चेत येण्सासाठी लोक काहीही करतात. अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत ते नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात आणि प्रसिद्ध होतात. असे अनेक व्हिडीओ सतत सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात.