अखेर तो दिवस उजडलाच! आज धनत्रयोदशीपासून ६ राशींचे भाग्य उजाडणार, निरोगी आयुष्यासह मोठा धनलाभ होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक पंचांगानुसार आज शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी धनत्रयोदशीचा पवित्र दिवस साजरा केला जात आहे. दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात मानला जाणारा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो.
मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी धनत्रयोदशीचा पवित्र दिवस साजरा केला जात आहे. दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात मानला जाणारा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो. आज ग्रहांची स्थिती अनुकूल असून, काही राशींसाठी हा दिवस विशेष लाभदायी ठरणार आहे. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने आज ग्रहांचा दुर्लभ संयोग होत असल्याने सर्व १२ राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. पाहूया, देवी लक्ष्मीच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहणार आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांना काहीतरी नव्याने करण्याची प्रेरणा मिळेल. महिलांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा. आत्मविश्वास वाढेल आणि दिवस उत्साही जाईल.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींना आज दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल आणि मानसिक समाधान लाभेल.
advertisement
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना आज शिक्षण क्षेत्रात काही आर्थिक अडचणी जाणवतील, मात्र तुमच्या प्रयत्नांनी त्या अडचणी दूर होतील. संयम ठेवा आणि लक्ष्य स्पष्ट ठेवा, यश नक्की मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावे. आवश्यक त्या ठिकाणीच पैसा वापरा. कोणतीही फसवणूक किंवा गैरफायदा होणार नाही याची खबरदारी घ्या. संयम राखल्यास नुकसान टळेल.
advertisement
सिंह
सिंह राशीच्या महिला आज थोड्या एकलकोंड्या वाटू शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेक वापरा. कुटुंबीयांकडून आधार मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनी आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेवाईकांकडून काही अपेक्षाभंग होऊ शकतो, परंतु सहनशीलता राखा. कार्यक्षेत्रात थोडा संयम ठेवावा.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींनी आज कोणतीही गोष्ट मनावर घेऊ नये. आपले काम शांतपणे करत राहा. अंधविश्वास आणि पैशाचा अति लोभ टाळल्यास दिवस सुरळीत जाईल.
advertisement
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी आज राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे. नोकरी आणि व्यवसायात संभाषण करताना विचारपूर्वक बोला. गैरसमज होऊ नयेत याची दक्षता घ्या.
धनु
धनु राशीच्या लोकांचे स्पष्टवक्तेपण आज काहींची मने दुखावू शकते. तरीही तरुण वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदार निवडण्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या महिलांना आज मंगल कार्याची गडबड राहील. काही लहान अडचणी आल्या तरी त्या दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
advertisement
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज मनासारखे सुख लाभेल. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले काही काम पूर्ण होतील. परदेशी प्रवासाचे बेत आखले जातील.
मीन
मीन राशीच्या व्यक्तींना आज जोडीदारासोबत संवाद साधण्याची संधी मिळेल. नातेसंबंधात मधुरता वाढेल. दिवस उत्साही आणि आनंददायी राहील.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2025 6:25 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अखेर तो दिवस उजडलाच! आज धनत्रयोदशीपासून ६ राशींचे भाग्य उजाडणार, निरोगी आयुष्यासह मोठा धनलाभ होणार