खूपचं सुंदर आणि आकर्षक असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, करिअरमध्ये मिळते ग्रोथ, जगतात लक्झरी लाइफ

Last Updated:

हा मूलांक असलेल्या व्यक्ती शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे सौंदर्य, पैसा आणि यश एकत्र घेऊन येतात, ज्यामुळे त्यांचे जीवन खूप सुखकर आणि विलासी होते.

News18
News18
Numerology : अंकशास्त्रनुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा ग्रह सौंदर्य, प्रेम, कला, विलासिता आणि भौतिक सुखांचा कारक मानला जातो. त्यामुळे मूलांक 6 असलेल्या व्यक्तींमध्ये या ग्रहाचे सर्व गुण नैसर्गिकरित्या दिसून येतात. या व्यक्ती अत्यंत आकर्षक, शांत आणि आनंदी स्वभावाच्या असतात. त्यांना जीवनात सर्व सुखसोयी आणि उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होते.
आकर्षण आणि व्यक्तिमत्त्व : शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक खूप सुंदर, आकर्षक आणि चुंबकीय व्यक्तिमत्त्वाचे असतात. लोक त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतात आणि त्यांचा प्रभाव इतरांवर पडतो.
कला आणि सर्जनशीलता : या लोकांमध्ये कला आणि सौंदर्यदृष्टी उपजत असते. चित्रकला, संगीत, अभिनय, फॅशन डिझायनिंग किंवा लेखन अशा कलात्मक आणि सर्जनशील क्षेत्रांत त्यांना मोठे यश मिळते.
advertisement
आर्थिक संपन्नता : पैशांच्या बाबतीत हे लोक खूप भाग्यवान ठरतात. त्यांच्या गरजा आपोआप पूर्ण होतात आणि त्यांना भौतिक सुखे सहज उपलब्ध होतात. ते उत्तम जीवनशैली जगतात.
करिअरमध्ये ग्रोथ : हॉटेल व्यवसाय, चित्रपटसृष्टी, दागिने, कपडे किंवा सौंदर्य प्रसाधनांसारख्या शुक्र संबंधित व्यवसायांमध्ये त्यांना चांगली वाढ आणि मोठे यश मिळते. त्यांची नेतृत्व करण्याची क्षमताही चांगली असते.
advertisement
शांत आणि समजूतदार स्वभाव : ते स्वभावाने शांत, प्रेमळ आणि समजूतदार असतात. ते आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या नात्यात गोडवा टिकवून ठेवतात.
विलासी जीवनशैली : या लोकांना चांगल्या गोष्टींची आवड असते. उच्च दर्जाचे कपडे, आलिशान घरे आणि महागड्या वस्तूंची त्यांना आवड असते आणि ते ती पूर्णही करतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
खूपचं सुंदर आणि आकर्षक असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, करिअरमध्ये मिळते ग्रोथ, जगतात लक्झरी लाइफ
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement