Aja Ekadashi 2025: मंगळागौरी आणि एकादशीची एकत्र पूजा करण्याची संधी; मंगळवारी अमंगळ करा दूर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Aja Ekadashi 2025: अजा एकादशी ही अतिशय विशेष मानली जाते. यंदा ही शुभ तिथी मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अजा एकादशीच्या दिवशी उपवास, पूजा आणि काही विशेष उपाय केल्यानं आपल्या जीवनात सुरू असलेल्या अनेक समस्या संपू शकतात.
मुंबई : हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी 24 एकादशी साजऱ्या होतात, त्यापैकी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच अजा एकादशी ही अतिशय विशेष मानली जाते. यंदा ही शुभ तिथी मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अजा एकादशीच्या दिवशी उपवास, पूजा आणि काही विशेष उपाय केल्यानं आपल्या जीवनात सुरू असलेल्या अनेक समस्या संपू शकतात. त्यासोबत या दिवशी श्रावणातील शेवटचे मंगळागौरी व्रतही साजरे करता येईल. अजा एकादशीचे महत्त्व आणि उपाय जाणून घेऊया.
अजा एकादशी 2025 शुभ योग
पंचांगानुसार एकादशी तिथी 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 05:22 वाजता सुरू होत आहे आणि 19 ऑगस्ट रोजी दुपारी 03:32 वाजता संपेल. उदय तिथी लक्षात घेता, अजा एकादशीचे व्रत केवळ मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीच वैध असेल. अजा एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सिद्धी योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये भगवान नारायणाची पूजा केल्याने सर्व त्रास आणि समस्यांपासून सुटका होते.
advertisement
अजा एकादशी २०२५ पूजाविधी - अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. या दिवशी भाविक उपवास करतात पाणी, फळे, तुळशीने श्रीहरीची पूजा केली जाते. याशिवाय घरात धन आणि समृद्धी राहावी म्हणून माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या व्रताचे महत्त्व पौराणिक कथांमध्येही सांगितले आहे, त्यामुळे पापांपासून मुक्ती आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो, असे मानले जाते.
advertisement
अजा एकादशी २०२५ उपाय -
ज्योतिषांच्या मते, अजा एकादशीच्या दिवशी काही सोपे उपाय करणे खूप फायदेशीर आहे. उदाहरणार्थ, या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले आणि मिठाई अर्पण केल्याने कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतात. त्याच वेळी, हळद मिसळलेल्या पाण्याने स्नान करून केळीच्या झाडाची पूजा केल्याने भाग्य प्राप्त होते. अजा एकादशीबद्दल असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने हजारो गायींच्या दानाइतके पुण्य मिळते. म्हणूनच दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या दिवशी उपवास करतात आणि भगवान विष्णूची पूजा करतात.
advertisement
मंगळागौरीची पूजा -
मंगळागौरीची पूजा ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पारंपारिक धार्मिक विधी आहे, जी प्रामुख्याने नवविवाहित स्त्रिया श्रावण महिन्यात करतात. या पूजेमागे अनेक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व दडलेले आहे. मंगळागौर म्हणजे पार्वती देवी. या व्रतामध्ये पार्वती आणि शिव दोघांचीही पूजा केली जाते. या पूजेचा मुख्य उद्देश पार्वती देवीला प्रसन्न करून तिच्याकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळवणे हा असतो.
advertisement
मंगळागौरीचे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी केले जाते. ज्याप्रमाणे पार्वती देवीने भगवान शंकरासाठी कठोर तपश्चर्या केली, त्याच भावनेने हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते, कुटुंबात सुख-शांती नांदते आणि वैवाहिक जीवन आनंदी होते अशी श्रद्धा आहे. नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. .
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Aja Ekadashi 2025: मंगळागौरी आणि एकादशीची एकत्र पूजा करण्याची संधी; मंगळवारी अमंगळ करा दूर