Angarki chaturthi 2025: तूच सुखकर्ता..! अंगारकी संकष्टीचा दिवस खास; पाहा धार्मिक महत्त्व, पूजा-विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Angarki chaturthi 2025: अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस गणेश पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. संकष्टी चतुर्थी दर महिन्याच्या कृष्ण पक्षात येत असते, पण जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
मुंबई : आज पूर्वाभाद्रपद नक्षत्रावर अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत अनेक गणपती बाप्पाचे श्रद्धावान भक्त मोठ्या उत्साहानं करतात. संकष्टीला सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळते. संकष्टी व्रतामध्ये अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस गणेश पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. संकष्टी चतुर्थी दर महिन्याच्या कृष्ण पक्षात येत असते, पण जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. अंगारक हे मंगळ ग्रहाचे एक नाव आहे. या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व -
या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वर्षभरात केलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रतांचे फळ मिळते असे मानले जाते. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरातील संकटे दूर होतात, सुख-समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात. एका संकष्टीचे व्रत करून आपण वर्षभरातील सर्व संकष्टी केल्याचं पुण्य मिळवू शकतो.
अंगारकी संकष्टीची पूजा विधी -
सकाळी लवकर उठून स्नान करावे. मंगळवार हा दिवस असल्याने लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. दिवसभर व्रत करण्याचा संकल्प करा. शक्य असल्यास उपवास करा. एका पाटावर गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर) आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर मूर्तीला वस्त्र अर्पण करा. गणपतीला लाल फुले, दुर्वा, शेंदूर आणि मोदक अर्पण करा. ॐ गं गणपतये नमः किंवा ॐ विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा आणि अंगारकी चतुर्थीची कथा वाचावी. चंद्रोदयाच्या वेळेनुसार चंद्राचे दर्शन घेऊन, त्याला अर्घ्य (पाणी) अर्पण करून नमस्कार करा. चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडावा. अंगारकीचा चंद्रोदय 9.13 पासून होईल. पूजेनंतर गणपतीला नैवेद्य दाखवा आणि आरती करा. या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
अंगारकीला काय करावे?
या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
गरिबांना अन्नदान किंवा गरजूंना मदत करावी.
गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्राचे पठण करणे लाभदायक मानले जाते.
कर्जातून मुक्त होण्यासाठी हनुमान आणि गणपती बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Angarki chaturthi 2025: तूच सुखकर्ता..! अंगारकी संकष्टीचा दिवस खास; पाहा धार्मिक महत्त्व, पूजा-विधी