महामारीसाठी तयार राहा! 63 वर्षांनंतर 'तो' प्राणघातक विषाणू पुन्हा येणार? बाबा वेंगांची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
जगातील सर्वात प्रसिद्ध भविष्यावक्त्यांपैकी एक असलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी नेहमीच जगाला हादरवून सोडले आहे.
Baba Vanga Predictions : जगातील सर्वात प्रसिद्ध भविष्यावक्त्यांपैकी एक असलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी नेहमीच जगाला हादरवून सोडले आहे. 9/11 चा हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि कोरोना महामारी यांसारखी त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा केला जातो. आता 2026 हे वर्ष सुरू झाले असून, या वर्षासाठी त्यांनी केलेली काही भयानक भाकीतं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी
बाबा वेंगा यांच्या सर्वात भयानक दाव्यानुसार, 2026 मध्ये जगातील बलाढ्य देशांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होऊन तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते. त्यांनी असा इशारा दिला होता की, युरोप आणि आशियामधील तणाव वाढल्याने अनेक देशांच्या सीमा बदलू शकतात. सध्याची जागतिक राजकीय परिस्थिती पाहता, लोकांमध्ये या भाकीतामुळे भीतीचे वातावरण आहे.
एलियन्सची पृथ्वीवर एन्ट्री
बाबा वेंगा यांच्या दाव्यानुसार, नोव्हेंबर 2026 मध्ये मानव पहिल्यांदा परग्रहवासीयांशी संपर्क साधेल. एका मोठ्या अंतराळ यानातून हे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते मानवांशी थेट संवाद साधतील. हे भाकीत वाचायला काल्पनिक वाटत असले तरी, खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच अंतराळात नोंदवलेल्या काही रहस्यमय हालचालींमुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
advertisement
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वर्चस्व
तंत्रज्ञानाच्या बाबतीत बाबा वेंगा यांनी सावध केले होते की, 2026 मध्ये एआय इतके प्रगत होईल की ते मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाईल. मानवी निर्णयक्षमतेवर एआय वर्चस्व गाजवेल आणि यामुळे मानवी जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते. 'यंत्र मानवाचा मालक बनेल' असे संकेत त्यांनी दिले होते.
विनाशकारी नैसर्गिक आपत्ती
भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि समुद्रातील प्रचंड वादळे यामुळे 2026 मध्ये जगाचा मोठा भूभाग बाधित होऊ शकतो. त्यांच्या मते, पृथ्वीचा सुमारे 7 ते 8 टक्के भूभाग या नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यात येईल. वाढत्या हवामान बदलामुळे ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.
advertisement
आर्थिक मंदी आणि पुरवठा साखळी विस्कळीत
सागरी मार्गांवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अन्नाचा पुरवठा विस्कळीत होईल. यामुळे जागतिक स्तरावर अन्नाचे भाव गगनाला भिडतील आणि जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. बँकिंग क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम होईल.
नवीन घातक विषाणूचा धोका
बाबा वेंगा यांनी एका 63 वर्षे जुन्या किंवा सुप्त अवस्थेत असलेल्या भयानक विषाणूच्या पुनरागमनाबद्दल संकेत दिले होते. हा विषाणू मानवासाठी अत्यंत प्राणघातक ठरू शकतो, ज्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य आणीबाणी लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 2:58 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
महामारीसाठी तयार राहा! 63 वर्षांनंतर 'तो' प्राणघातक विषाणू पुन्हा येणार? बाबा वेंगांची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरणार









