Life Tips : महिला-तरुणींना पाहून मनात सतत अश्लील विचार? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं मनाला कसं आवरायचं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Life Tips Marathi: मनात येणारे चांगले आणि वाईट दोन्ही विचार आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्तरावर गोंधळू टाकतात. अनेक लोकांना परस्त्रीकडे पाहून मनात वाईट विचार येतात. सहसा खुलेपणानं याविषयी बोललं जात नाही पण...
नवी दिल्ली : माणसाचं मन खूप चंचल असतं, ते कधीच स्थिर राहत नाही. मनात येणारे चांगले आणि वाईट दोन्ही विचार आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्तरावर गोंधळू टाकतात. अनेक लोकांना परस्त्रीकडे पाहून मनात वाईट विचार येतात. सहसा खुलेपणानं याविषयी बोललं जात नसलेल्या या विषयाबाबत वृंदावनचे संत श्री प्रेमानंद महाराज यांनी मार्गदर्शन केलं, दुसऱ्या स्त्रीकडे पाहून वाईट विचार आल्यास काय करावे? तसेच, मन कसे साधावे, जेणेकरून वासनेची भावना जागृत होणार नाही.
नेत्रांची चंचलता कशी नियंत्रित करावी?
वृंदावन येथील श्री राधा हित केली कुंज आश्रमात प्रेमानंद महाराज दररोज आपल्या भक्तांशी चर्चा करतात. या चर्चेदरम्यान एका भक्ताने महाराजांना प्रश्न विचारला की, "नेत्रांची चंचलता कशी नियंत्रित करायची?"
या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, "चंचल मनाला तुम्हालाच आवर घालावा लागेल. चुकीच्या व्यभिचारापासून वाचण्यासाठी नासाग्र दृष्टी योगाचा अभ्यास करा. तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल, त्याचे नामस्मरण करा."
advertisement
स्पर्श, रूप, गंधाच्या कामनांनी सर्वांना वश केलंय - महाराज पुढे म्हणाले की, "या दृष्टीने तुम्हाला काय पाहायचे आहे? मल-मूत्राचे द्वार असलेल्या, संपूर्ण चामड्याने झाकलेल्या शरीराला तुम्ही काय पाहता? तुम्हाला ज्या सुखाचा उपभोग घ्यायचा होता, त्याची प्राप्ती झाली का! खरे सुख तर भगवंताच्या नावाच्या रसरुपी अमृतामध्ये आहे, त्यांच्या दर्शनासाठी मन व्याकूळ झाले पाहिजे."
advertisement
"स्पर्श, रूप, गंधाच्या कामनांनी सर्वांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. जर देवाने डोळे दिले आहेत, तर त्यांचा सदुपयोग करा. नाहीतर, पुढील जन्मी देव तुम्हाला नेत्रहीन बनवून पाठवेल. डोळे मिळाले आहेत, तर संत दर्शन आणि प्रभूंचे दर्शन करा."
advertisement
मनातील वाईट विचार सर्वकाही नष्ट करतील - प्रेमानंद महाराज
आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही परक्या स्त्रीबद्दल मनात वाईट विचार आणणं पाप आहे. कोणत्याही माता-भगिनींकडे वाईट दृष्टीनं (काम-दृष्टी) पाहाल, तर तुमची संपूर्ण शक्ती, पुण्य आणि तेज नष्ट होईल.
आजची नवी पिढी मोबाईलमध्ये घाणेरड्या गोष्टी पाहूनच चुकीचे आचरण (वर्तन) स्वीकारत आहे. महाराज म्हणाले की, "मनुष्य जन्म मिळाला आहे, तर मन चांगल्या कर्मांमध्ये लावा. तुमच्या दृष्टीचा वापर केवळ राधा नाम आणि दिव्य दर्शनासाठीच व्हायला हवा, अन्यथा शरीराचा नाश होणे निश्चित आहे."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 5:23 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Life Tips : महिला-तरुणींना पाहून मनात सतत अश्लील विचार? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं मनाला कसं आवरायचं