Numerology: कष्टाचं फळ आता दिसेल! या 4 जन्मतारखा असणाऱ्यांना बुधवार लकी ठरणार

Last Updated:

Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 13 नोव्हेंबर 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा आनंद डोक्यात जाऊ देऊ नका. दूरच्या व्यक्तीशी संवाद फायदेशीर ठरल्याने तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली असेल. तुम्हाला मानसिक बळ जाणवेल. सट्टेबाजांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. तुम्हाला थोडा वेळ आराम करण्याची आणि जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज आहे. सप्ताहाच्या शेवटी सहलीचे नियोजन करा.
advertisement
Lucky Number : 18
Lucky Colour : Indigo
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सहकारी किंवा शेजाऱ्याशी जोरदार वाद होऊ शकतो. मुलांसोबत आनंदाचे क्षण साजरे कराल. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या उत्साह जाणवेल. नवीन फिटनेस प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. खर्च जास्त होईल. त्या तुलनेत आर्थिक नफा मिळणार नाही. जोडीदाराशी मतभेद झाल्यास तुम्ही तणावात असाल.
advertisement
Lucky Number : 17
Lucky Colour : Lavender
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
ज्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवता, त्या व्यक्ती तुम्हाला निराश करतील. मुलांकडून नकारात्मक माहिती मिळू शकते. वैद्यकीय गोष्टींवर मोठा खर्च होऊ शकतो. पण हा खर्च तुमच्या आरोग्यासाठी नसेल. घरातील वाढत्या खर्चामुळे काळजी वाटेल. पण काळजी करू नका, कारण उत्पन्न वाढू शकते. रोमान्सची शक्यता नाही.
advertisement
Lucky Number : 1
Lucky Colour : Brown
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा कल तत्त्वज्ञानाकडे असेल. आईशी प्रेमळ संवाद होईल. जमिन किंवा मालमत्ता संपादनाची संधी मिळेल. अनपेक्षितपणे एखादी वादळी स्थिती निर्माण होऊ शकते. एखादं नातं तुटत आहे, असं तुम्हाला वाटेल; पण तो तुमच्या मनातला विचार असेल. परिस्थितीचा आढावा घेतल्यास कोणत्या दिशेने वाटचाल करायची ते दिसेल.
advertisement
Lucky Number : 18
Lucky Colour : Lemon
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
उच्चपदस्थ व्यक्ती तुम्हाला मदत करेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं सिंहावलोकन करण्याच्या मूडमध्ये असाल. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार तुमच्यासाठी नशिबवान ठरेल.
advertisement
Lucky Number : 4
Lucky Colour : Saffron
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दूरचे नातेवाईक दुरावू शकतात. दिवसभर थकवा जाणवेल. एखादी व्यक्ती तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. उत्पन्नात चढ-उतार असला तरी नशीब अनुकूल असेल. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीला भेटून, त्या व्यक्तीशी मैत्री कराल.
advertisement
Lucky Number : 22
Lucky Colour : Violet
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
योग्य माहिती आणि अफवा यांच्यातील फरक ओळखा. आईशी प्रेमळ संवाद साधाल. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावध रहा. तुमच्या यशात तुमचे नशीब आणि कठोर परिश्रमाचा वाटा मोठा असेल. प्रेमसंबंध दृष्टीपथात आहेत. प्रेमजीवनात नवीन व्यक्ती किंवा जुनी एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.
Lucky Number : 5
Lucky Colour : Cream
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
महत्त्वाकांक्षा पूर्तीचे स्वप्न पहाल. दिवसभर मनात असंतोषाची भावना असेल. तुमचे प्रतिस्पर्धी सक्रिय असतील. पण युक्ती आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर त्यांच्यावर विजय मिळवाल. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती असेल. जोडीदार तुमच्या मदतीचं कौतुक करेल.
Lucky Number : 1
Lucky Colour : Peach
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
पुढे वाटचाल कराल. घर बदलण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळा. तुम्ही अव्वल आहात असं तुम्हाला वाटेल. तुमचा उत्साह आसपासच्या लोकांवर परिणाम करेल. ऑफिसमधील एखादी व्यक्ती तुम्हाला बदनाम करण्यासाठी गुप्तपणे काम करेल. त्यामुळे सावध रहा. जोडीदारासह चांगला अनुभव मिळेल. तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
Lucky Number : 4
Lucky Colour : Indigo
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: कष्टाचं फळ आता दिसेल! या 4 जन्मतारखा असणाऱ्यांना बुधवार लकी ठरणार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement