Dhanteras Vastu Tips: धनत्रयोदशीला घरी करा मिठाचे हे वास्तू उपाय; भाग्याची साथ कायम मिळते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dhanteras Vastu Tips: धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या दारात मीठ मिश्रित पाणी शिंपडावे. वास्तू शास्त्रानुसार हा उपाय केल्यानं घरातील दरिद्रता दूर होते. हा सोपा उपाय तुमच्या जीवनात आर्थिक संपन्नता घेऊन येतो, तसेच घरातील लोकांमध्ये संतुलन टिकून राहते.
मुंबई : धनत्रयोदशीचा सण १८ ऑक्टोबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल. या दिवशी धार्मिक विधींसोबतच वास्तूचे काही उपाय केल्यास तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला धलानत्रयोदशीच्या दिवशी करायच्या वास्तू उपायांबद्दल सांगत आहोत. हे उपाय केल्यानं तुमची आर्थिक बाजू सुधारते आणि जीवनात सकारात्मकता येते.
धनत्रयोदशीला मिठाचे उपाय: धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या दारात मीठ मिश्रित पाणी शिंपडावे. वास्तू शास्त्रानुसार हा उपाय केल्यानं घरातील दरिद्रता दूर होते. हा सोपा उपाय तुमच्या जीवनात आर्थिक संपन्नता घेऊन येतो, तसेच घरातील लोकांमध्ये संतुलन टिकून राहते.
मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे: धनत्रयोदशीच्या सकाळी तुम्ही घरात मीठ मिश्रित पाण्याच्या पोछा (फरशी पुसणे) अवश्य लावावा. हा सोपा उपाय घरात असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो. वास्तू शास्त्रानुसार, हा उपाय केल्याने ग्रहांचा वाईट परिणामही तुमच्यावरून कमी होतो.
advertisement
मीठ खरेदी करणे: तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा व्हावी, असे तुम्हाला वाटत असेल, तर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुम्ही मीठ खरेदी देखील केले पाहिजे. या दिवशी मीठ खरेदी केल्याने माता लक्ष्मी कृपा करते आणि तुम्हाला धन-धान्याची प्राप्ती होते.
मिठाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी: या उपायांव्यतिरिक्त मिठाशी संबंधित काही खास गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही कोणाकडून मीठ उधार घेऊ नये आणि कोणाला उधार देऊ नये. तुम्ही असे केले, तर धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊ शकते आणि तुमच्या जीवनात पैशांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanteras Vastu Tips: धनत्रयोदशीला घरी करा मिठाचे हे वास्तू उपाय; भाग्याची साथ कायम मिळते