Shravan 2025: श्रावणात उपवास करणाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी अशी वाहा शिवामूठ; भोलेनाथ कृपा करतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Shravan 2025: श्रावण सोमवारचं व्रत-उपवास आणि महादेवाला शिवामूठ वाहनं हे महत्त्वाचे धार्मिक विधी मानले जातात. महादेवाला श्रावण महिना खूप प्रिय असतो आणि या महिन्यात भोलेनाथाची मनोभावे पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
मुंबई : शिव पूजेसाठी खास आणि हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला असून 28 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण सोमवारचं व्रत-उपवास आणि महादेवाला शिवामूठ वाहनं हे महत्त्वाचे धार्मिक विधी मानले जातात. महादेवाला श्रावण महिना खूप प्रिय असतो आणि या महिन्यात भोलेनाथाची मनोभावे पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंभू-महादेवाच्या पिंडीवर एक मूठभर विशिष्ट धान्य अर्पण करणे, याला शिवामूठ असे म्हणतात. हा एक धार्मिक विधी असून, तो विवाहानंतरच्या पहिल्या पाच वर्षांपर्यंत स्त्रिया पाळतात, असे मानले जाते. यामागे असा विश्वास आहे की शिवामूठ वाहिल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते आणि रोगराई, अडचणी दूर होतात. तसेच अहंकाराचा त्याग, समर्पण आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेले हे एक प्रकारचे अर्पण आहे.
advertisement
कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी?
श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण केले जाते. यावर्षी श्रावणात ४ सोमवार आहेत.
पहिला श्रावणी सोमवार: २८ जुलै २०२५
शिवामूठ: तांदूळ
दुसरा श्रावणी सोमवार: ४ ऑगस्ट २०२५
शिवामूठ: तीळ
तिसरा श्रावणी सोमवार: ११ ऑगस्ट २०२५
शिवामूठ: मूग
चौथा श्रावणी सोमवार: १८ ऑगस्ट २०२५
advertisement
शिवामूठ: जव (जवसाचे दाणे)
शिवामूठ वाहण्याची पद्धत आणि पूजा विधी: श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास, या दिवशी उपवास करावा (निराहार किंवा फलाहार). घरातील शिवलिंगाची किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन शंकराची पूजा करावी. गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा. महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुले, मध, फळे, साखर, अगरबत्ती आणि निरांजन अर्पण करावे. ॐ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
advertisement
शिवामूठ अर्पण: प्रत्येक सोमवारानुसार एक मूठभर धान्य घेऊन ते शिवलिंगावर 'शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदा-जावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा'** हा मंत्र (प्रार्थना) म्हणून अर्पण करावे. काही ठिकाणी शिवमूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' हा मंत्रही म्हणतात.
advertisement
त्यानंतर धूप-दीप लावून महादेवाची आरती करावी. श्रावणी सोमवारची कथा वाचावी किंवा ऐकावी.
शिवामूठ धान्य खाऊ नये -
ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नाही, ते घरीच शिवलिंगाची किंवा शंकराच्या प्रतिमेची पूजा करू शकतात. शिवामूठ ही वाहिल्यानंतर उचलून पक्ष्यांना किंवा जनावरांना खाऊ घालतात. ती प्रसाद म्हणून खाल्ली जात नाही. हे व्रत साधारणपणे विवाहाच्या पहिल्या पाच वर्षांसाठी केले जाते, परंतु काही जण आयुष्यभर श्रद्धापूर्वक करतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 27, 2025 10:22 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावणात उपवास करणाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी अशी वाहा शिवामूठ; भोलेनाथ कृपा करतील


