अखेर कष्टाला न्याय मिळणार! २०२६ च्या सुरवातीला गजकेसरी योग, या राशींच्या श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार

Last Updated:

Astrology News : २०२५ वर्ष आता अखेरच्या टप्प्यात आले असून, सर्वत्र नववर्ष 2026 ची उत्सुकता दिसत आहे. नव्या वर्षाबाबत ज्योतिषांच्या भाकितांनुसार, २०२६ ची सुरुवात अत्यंत शुभ ठरणार आहे.

Astrology News
Astrology News
मुंबई : २०२५ वर्ष हे आता अखेरच्या टप्प्यात आले असून, सर्वत्र नववर्ष २०२६ ची उत्सुकता दिसत आहे. नव्या वर्षाबाबत ज्योतिषांच्या भाकितांनुसार, २०२६ ची सुरुवात अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण, या वर्षाची सुरुवात होताच एक प्रभावशाली योग गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. हा योग धन, कीर्ती आणि यश देणारा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, हा शुभ योग विशेषतः वृषभ, मिथुन आणि तूळ या राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
२०२६ मध्ये शुभ गजकेसरी राजयोगाचा संयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू (बृहस्पति) आणि चंद्र यांच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार होतो. ही युती जिथे घडते, त्या राशीच्या व्यक्तींना संपत्ती, सन्मान, यश आणि आनंद प्राप्त होतो. २०२६ च्या सुरुवातीला गुरू मिथुन राशीत वक्री अवस्थेत असेल. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:२५ वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:४२ पर्यंत तेथे राहील. या कालावधीत गुरू आणि चंद्राची युती होऊन गजकेसरी राजयोगाची निर्मिती होईल. हा योग तयार होताच, काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होईल.
advertisement
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२६ चे वर्ष सोन्याचे पर्वणीसारखे ठरणार आहे. या काळात नोकरीत बढती, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. व्यवसायिकांना नव्या संधी मिळतील आणि व्यापारात प्रगती होईल. घरात शुभकार्याची शक्यता आहे, तसेच अविवाहित व्यक्तींसाठी विवाहयोग तयार होईल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभल्याने बचत आणि उत्पन्न दोन्ही वाढतील.
मिथुन राशी
गजकेसरी राजयोगाचा सर्वाधिक परिणाम मिथुन राशीवर होणार आहे, कारण हा योग याच राशीत तयार होत आहे. गुरू आणि चंद्राची युती या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान, यश आणि मोठे आर्थिक लाभ देईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. बोलण्यात आकर्षकता येईल, ज्यामुळे नवीन संबंध आणि संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग हा भाग्यवृद्धीचा काळ घेऊन येणार आहे. करिअरमध्ये मोठे बदल आणि नवीन दिशा मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती सुधारेल, मालमत्तेचे व्यवहार अनुकूल राहतील. तसेच, आरोग्य सुधारेल आणि मानसिक समाधान वाढेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभल्याने या काळात प्रगतीचा मार्ग खुला होईल.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अखेर कष्टाला न्याय मिळणार! २०२६ च्या सुरवातीला गजकेसरी योग, या राशींच्या श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement