Religious: काही लोक जास्त देवपूजा वैगेर न करताही आयुष्यात यशस्वी कसे होतात; कोणत्या गोष्टी कारण?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Religious: तुमच्या आजूबाजूला असे लोक असू शकतात, जे कोणत्याही विशेष पूजा-विधी न करता मोठे यश मिळवतात आणि श्रीमंत बनलेले असतात. एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना असा प्रश्न विचारला. "काही लोक पूजा-विधी करत नसले तरी इतके यशस्वी का होतात?
मुंबई : कित्येक लोक देवाची खूप पूजा करतात, देवाची पूर्ण भक्ती करतात. पण तरीही त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत मग लोक स्वतःला आणि देवाला शाप देऊ लागता. पण, तुमच्या आजूबाजूला असे लोक असू शकतात, जे कोणत्याही विशेष पूजा-विधी न करता मोठे यश मिळवतात आणि श्रीमंत बनलेले असतात. एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना असा प्रश्न विचारला. "काही लोक पूजा-विधी करत नसले तरी इतके यशस्वी का होतात?" प्रेमानंद महाराजांनी त्यावर असं उत्तर दिलं.
या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, याचे कारण प्रारब्ध आहे, ते आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. काही लोक आज पापे करू शकतात, परंतु त्यांना भूतकाळातील चांगल्या कर्मांचे फळ अजूनही मिळत असू शकतं, म्हणूनच ते विशेष काही न करता आरामात जगतात. भूतकाळातील वाईट कर्मांची वेळ येईल तेव्हा त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.
advertisement
महाराजांनी पुढं सांगितलं, इतकंच काय काही चांगले आणि धार्मिक लोक, अगदी देवाचे नाव जपणारे देखील अडचणींना तोंड देतात. ते आज पुण्य कर्म करत असतील, पण त्यांची भूतकाळातील वाईट कृत्ये आता अडथळा आणतात. अशा वेळी आपण निराश होऊ नये, कारण एके दिवशी आपले नशिबातील वाईट कर्मे संपतील आणि आपल्याला आपल्या चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच मिळेल.
advertisement
प्रेमानंद महाराज म्हणतात, आपल्याला आयुष्यात वारंवार अपयश आलं, नोकरी मिळाली नाही किंवा गोष्टी चुकीच्या झाल्या तर नाराज होण्याची गरज नाही. जर एक मार्ग बंद झाला तर आपण दुसरा मार्ग पाहिला पाहिजे. अभ्यास यशस्वी झाला नाही, तर छोटा व्यवसाय सुरू करा, मजूर म्हणून काम करा किंवा रिक्षा चालवा. ही सर्व चांगली कामेच आहेत. मेहनती व्यक्ती, जरी ती लहान नोकऱ्यांपासून सुरुवात करत असली तरी हळूहळू प्रगती करते. यश केवळ मोठ्या नोकरीतून मिळत नाही, तर प्रामाणिकपणा आणि प्रयत्नातून मिळते.
advertisement
देव कधीही कठोर नाही. तो आपले समर्पण पाहतो आणि आपली अनेक वेळा परीक्षा पाहतो. आपण या परीक्षांना तोंड देत राहिलो तर देव नक्कीच त्याचे आशीर्वाद देईल. जसे सुदामा अनेक दिवस उपाशी राहिला, परंतु शेवटी देवाने त्याला इतके काही दिले की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. कोणत्याही भक्तासोबतही असेच घडू शकते.
advertisement
प्रेमानंद महाराज म्हणतात की, आपले दुःख पाहून देवावरील विश्वास सोडू नका. देव प्रत्येक परिस्थितीत आपल्यासोबत असतो. आज गरिबी आहे, उद्या संपत्ती असू शकते. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे रामाचे नाव, ती कधीही संपत नाही. म्हणूनच, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि चांगले आचरण सोडू नये. अपयश आले तर मार्ग बदला, पण थांबू नका. देवावर विश्वास ठेवा, नामस्मरण करत राहा, आनंदी राहा. योग्य वेळ आल्यावर जीवन नक्कीच बदलेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Religious: काही लोक जास्त देवपूजा वैगेर न करताही आयुष्यात यशस्वी कसे होतात; कोणत्या गोष्टी कारण?


