Samudrikshastra: पायाच्या बोटांवर केसं असणं शुभ की अशुभ? सामुद्रिकशास्त्रात या गोष्टी क्लिअर सांगितल्या आहेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Samudrikshastra: सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराची ठेवण, चेहरा, हावभाव, हात-पायांची बोटे आणि त्यांच्यावर असलेल्या खुणा किंवा केस देखील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्याचे संकेत देतात. सामुद्रिक शास्त्रानुसार जाणून घेऊया, एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यावर किंवा बोटांवर केस असतील, तर याचा काय अर्थ होतो.
मुंबई : राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव-गुण-दोष बदलतात. चेहऱ्याची ठेवण आणि हावभावावरून एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज लावण्याबद्दल आपण नक्कीच ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की शरीराचे काही खास अवयव देखील व्यक्तीचे भाग्य आणि भविष्य दर्शवतात?
सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराची ठेवण, चेहरा, हावभाव, हात-पायांची बोटे आणि त्यांच्यावर असलेल्या खुणा किंवा केस देखील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्याचे संकेत देतात. सामुद्रिक शास्त्रानुसार जाणून घेऊया, एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यावर किंवा बोटांवर केस असतील, तर याचा काय अर्थ होतो.
पायाच्या बोटांवर केस असणे - सामुद्रिक शास्त्रानुसार, पायाच्या बोटांवर किंवा अंगठ्यावर केस असणं शुभ मानलं जातं. सहसा या केसांची संख्या खूप कमी असते, पण हे साधे वाटणारे केस देखील मोठे संकेत देतात. ज्या लोकांच्या पायाच्या बोटांवर केस असतात, ते जीवनात धन-समृद्धी प्राप्त करतात, असे म्हटले जाते. असे लोक आपल्या जीवनात चांगली आर्थिक स्थिती मिळवतात आणि नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीमध्ये यश मिळवतात.
advertisement
उज्ज्वल भाग्य आणि यशाचे प्रतीक - सामुद्रिक शास्त्र सांगतं की, पायाच्या बोटांवर केस असणं हे व्यक्तीच्या भाग्याचे संकेत आहे. अशा व्यक्ती मेहनती तर असतातच, पण त्यांना भाग्याचीही पूर्ण साथ मिळते. ते आपल्या प्रयत्नांनी जीवनात उंची गाठतात आणि कधीही हार मानत नाहीत. व्यापार-नोकरीमध्ये हे लोक यश मिळवतात. त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहते.
advertisement
भाग्यवान असतात असे लोक - ज्या लोकांच्या पायाच्या बोटांवर केस असतात, ते केवळ नशिबाच्या भरवशावर राहत नाहीत, तर आपल्या कर्माने यश मिळवतात. ते अत्यंत कर्मठ (कष्टाळू) आणि जबाबदार स्वभावाचे असतात. त्यांची मेहनत आणि निष्ठा त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक आपल्या प्रभावानं प्रत्येकाला प्रभावित करतात आणि जिथे जातात, तिथे सन्मान मिळवतात. हे लोक आपल्या भाग्यासोबतच कर्मावरही विश्वास ठेवतात, म्हणूनच जीवनात कधीही रिकाम्या हाताने राहत नाहीत.
advertisement
आत्मविश्वासी असतात - पायाच्या बोटांवर केस असलेले व्यक्ती आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी असतात. ते आपल्या विचारांवर ठाम राहतात आणि निर्णय घेताना अजिबात घाबरत नाहीत. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता देखील असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Samudrikshastra: पायाच्या बोटांवर केसं असणं शुभ की अशुभ? सामुद्रिकशास्त्रात या गोष्टी क्लिअर सांगितल्या आहेत


