June Sankashti: 3 शुभ योगात जून महिन्याची संकष्टी चतुर्थी! उपवास सोडण्यासाठी चंद्रोदय रात्री उशिरा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
June Sankashti Chaturthi 2025 : संकष्टी चतुर्थीची पूजा दिवसा केली जाते आणि रात्री चंद्राची पूजा करून अर्घ्य अर्पण केले जाते. जेष्ठ महिना असल्यानं संकष्टीचा उपवास धरलेल्यांना चंद्र उगवण्याची वाट पाहावी लागेल. कारण कृष्ण पक्षाचा चंद्र उशिरा उगवतो.
मुंबई : जून महिन्यातील संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाईल. जून महिन्याच्या संकष्टीच्या दिवशी ३ शुभ योग तयार होत आहेत. त्या दिवशी भद्रकाळही असेल. संकष्टी चतुर्थीची पूजा दिवसा केली जाते आणि रात्री चंद्राची पूजा करून अर्घ्य अर्पण केले जाते. जेष्ठ महिना असल्यानं संकष्टीचा उपवास धरलेल्यांना चंद्र उगवण्याची वाट पाहावी लागेल. कारण कृष्ण पक्षाचा चंद्र उशिरा उगवतो. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जूनची संकष्टी चतुर्थी कधी आहे? संकष्टी चतुर्थी मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ.
जून संकष्टी चतुर्थी 2025 - द्रिक पंचांगानुसार, जून महिन्याची ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी तिथी शनिवार, 14 जून रोजी दुपारी 3:46 वाजता सुरू होईल. ही तिथी 15 जून रोजी दुपारी 3:51 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार जून महिन्याची संकष्टी चतुर्थी शनिवार 14 जून रोजी आहे.
जून संकष्टी चतुर्थी 2025 मुहूर्त - संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त 04:02 AM ते 04:43 AM पर्यंत असेल. त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५४ ते दुपारी १२:४९ पर्यंत आहे. शुभ-उत्तम मुहूर्त सकाळी 07:07 ते 08:52 पर्यंत आहे.
advertisement
जूनची संकष्टी ३ शुभ योगात - या संकष्टी चतुर्थीला ३ शुभ योग तयार होत आहेत. उपवासाच्या दिवशी ब्रह्म योग सकाळपासून दुपारी ०१:१३ पर्यंत असेल. त्याच वेळी, इंद्र योग दुपारी ०१:१३ ते रात्री ०१:१३ पर्यंत असेल. चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग रात्री १२:२२ ते रात्री ०५:२३ पर्यंत असेल. चतुर्थीला उत्तराषाढा नक्षत्र १५ जून रोजी सकाळी १२:२२ ते पहाटे ०५:२३ पर्यंत असेल. त्यानंतर श्रावण नक्षत्र असते.
advertisement
जून संकष्टी चतुर्थी २०२५ चंद्रोदयाची वेळ - १४ जून रोजी संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री १०:०७ नंतर आहे. या काळात, उपवास करणाऱ्या व्यक्तीने चंद्राची पूजा करावी. त्यानंतर, कच्चे दूध, पांढरी फुले, अख्खा तांदूळ मिश्रीत पाणी अर्पण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर ते सेवन करून उपवास पूर्ण करावा.
advertisement
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व - धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात. जीवनात शुभफळ येतात आणि इच्छा पूर्ण होतात. या दिवशी गणेशाला दुर्वा, सिंदूर, मोदक, फळे इत्यादी अर्पण करावेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 07, 2025 11:50 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
June Sankashti: 3 शुभ योगात जून महिन्याची संकष्टी चतुर्थी! उपवास सोडण्यासाठी चंद्रोदय रात्री उशिरा