Navratri Ashtami 2025: नवरात्रातील महाअष्टमी आज! कन्या पूजेचा अभिजित मुहूर्त, पूजा-विधी जाणून घ्या

Last Updated:

Navratri Ashtami 2025: महाअष्टमी हा नवरात्रातील सर्वात खास दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी भाविक त्यांच्या घरात कन्या पूजा आणि कुमारी पूजा करून नवरात्राची सांगता करतात. या दिवशी कन्या पूजा केल्यानं इच्छित परिणाम मिळतात, जीवनात आनंद आणि समृद्धी वाढते.

News18
News18
मुंबई : आज 30 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रामधील महाअष्टमी साजरी केली जात आहे. महाअष्टमीला दुर्गा अष्टमी असंही म्हणतात. या दिवशी दुर्गेचे आठवे रूप असलेल्या देवी महागौरीची पूजा केली जाते. दुर्गा अष्टमीला गौरीची पूजा केल्यानं जीवनात आनंद आणि शांती मिळते. महाअष्टमी हा नवरात्रातील सर्वात खास दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी भाविक त्यांच्या घरात कन्या पूजा आणि कुमारी पूजा करून नवरात्राची सांगता करतात. या दिवशी कन्या पूजा केल्यानं इच्छित परिणाम मिळतात, जीवनात आनंद आणि समृद्धी वाढते. शारदीय नवरात्राच्या महाअष्टमीला कन्या पूजा आणि संधी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
महाअष्टमीला कन्या पूजन मुहूर्त - शारदीय नवरात्राच्या महाअष्टमीची तिथी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३१ वाजता सुरू झाली आणि आज, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०६ वाजता संपेल.
महाअष्टमीच्या दिवशी कन्या पूजनाचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी ५:०१ ते ६:१३ पर्यंत असेल. दुसरा शुभ मुहूर्त सकाळी १०:४१ ते दुपारी १२:११ पर्यंत असेल. याव्यतिरिक्त, कन्या पूजनासाठी अतिशय शुभ मानला जाणारा अभिजित मुहूर्त सकाळी ११:४७ ते दुपारी १२:३५ पर्यंत असेल. आज या तीन शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही कन्या पूजन करू शकता.
advertisement
महाअष्टमीला कन्या पूजन कसे केले जाते?
महाअष्टमीच्या दिवशी कन्या पूजनासाठी किमान ९ मुली आणि १ लहान मुलाला आमंत्रित करावे. मुली आल्यावर, प्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा, कपाळावर टिळा लावा आणि स्वच्छ आसनावर त्यांना बसवा. त्यानंतर त्यांचना आवडीचे स्वच्छ, शुद्ध आणि स्वादिष्ट जेवण खायला द्या. जेवणानंतर मुलींना तुमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करा.
advertisement
महाअष्टमीला कन्या पूजनाचे नियम -
नवरात्री दरम्यान, दररोज एका मुलीची पूजा केली जाते आणि अष्टमी किंवा नवमीला नऊ मुलींची पूजा केली जाते. या दिवशी २ वर्षांच्या मुलीची (कुमारी) पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते, असे मानले जाते. ३ वर्षांच्या मुलीची त्रिमूर्ती म्हणून पूजा केली जाते. त्रिमूर्ती मुलीची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी येते. ४ वर्षांच्या मुलीला कल्याणी मानले जाते. तिची पूजा केल्याने कुटुंबात कल्याण होते. ५ वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात. रोहिणीची पूजा केल्याने व्यक्तीचे आजार बरे होतात.
advertisement
६ वर्षांच्या मुलीची कालिका म्हणून पूजा केली जाते. कालिका ज्ञान, विजय आणि राजयोग देते. ७ वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात. चंडिकेची पूजा केल्याने घरात समृद्धी येते. ८ वर्षांच्या मुलीला शांभवी म्हणतात. तिची पूजा केल्याने वादविवादात विजय मिळतो. ९ वर्षांच्या मुलीला दुर्गा म्हणतात. तिची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. १० वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. सुभद्रा तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Navratri Ashtami 2025: नवरात्रातील महाअष्टमी आज! कन्या पूजेचा अभिजित मुहूर्त, पूजा-विधी जाणून घ्या
Next Article
advertisement
PCMC Election: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची 'दयनीय' स्थिती! पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची 'दयनीय' स्थिती! पिंपरी-चिंचवडमध्ये राज
  • अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची 'दयनीय' स्थिती! पिंपरी-चिंचवडमध्ये राज

  • अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची 'दयनीय' स्थिती! पिंपरी-चिंचवडमध्ये राज

  • अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची 'दयनीय' स्थिती! पिंपरी-चिंचवडमध्ये राज

View All
advertisement