Shoe Rack Direction: घराची प्रगती थांबते, नवीन काहीच घडत नाही; चपला ठेवण्याची जागा इतका परिणाम करते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Correct Shoe Rack Direction: घरातील सगळ्या चप्पल ठेवण्यासाठी रॅक वापरायला हवे, शिवाय त्याची दिशा देखील योग्य असायला हवी. याविषयी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींची माहिती पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलीय.
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घर असण्याचे फायदे अनेक दिसून येतात. त्यामुळे घर घेताना किंवा बांधताना वास्तुशास्त्र नियमांची काळजी घेतली जाते. मानवी जीवनाशी संबंधित सर्व वस्तू कोठे आणि कशा ठेवाव्या याची माहिती वास्तुशास्त्रात सांगितली आहे. कितीही सुंदर घर असेल आणि त्याच्या समोर दारात पडलेला चपलांचा ढिग घराची शोभा घालवतं. चप्पल ठेवण्यासाठी रॅक वापरायला हवे, शिवाय त्याची दिशा देखील योग्य असायला हवी. याविषयी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींची माहिती पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलीय.
बूट आणि चप्पल या फक्त पायात घालण्याच्या वस्तू नाहीत, त्यांचा ज्योतिषशास्त्रात शनि-राहुशी संबंध आहे. वास्तुशास्त्रात घरातील इतर गोष्टींचे ज्याप्रमाणे निश्चित स्थान-दिशा आहे, त्याप्रमाणे चपला ठेवण्याचीही जागा सांगितली आहे. चपला ठेवण्याची जागा दक्षिणेला असू नये, दक्षिण दिशा स्थिर मानली जाते आणि चपला या सतत धावपळ करणाऱ्या अस्थिर आहेत, त्या स्थिर दिशेला ठेवल्यानं प्रगती थांबू शकते, त्यामुळे चपला ठेवण्यासाठी दक्षिण दिशा टाळावी. आयुष्य स्थिर झालंय काहीच नवीन घडत नाही, असं वाटू लागतं
advertisement
योग्य दिशा कोणती - वास्तुशास्त्रानुसार चप्पल रॅक ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व या आहेत. या दिशांना चपला ठेवण्याचे फायदे अनेक मिळतात. आपला दिनक्रम यामुळे सोपा होतो, शिवाय मानसिकदृष्ट्याही हलके वाटते. घरातून बाहेर पडताना आपल्या इच्छेनुसार कामे होत आहेत असे वाटू लागे.
advertisement
चपला रॅक नेहमी स्वच्छ असाव्या - शूज रॅक नेहमी नीटनेटके आणि व्यवस्थित असले पाहिजेत. फार जुने, खराब, फाटलेले बूट ठेवू नयेत. बऱ्याच घरांमध्ये नवीन बूट खरेदी केल्यानंतरही जुने तिथेच पडून राहतात. यामुळे नकारात्मक गोष्टी वाढतात. वेळोवेळी शूज रॅक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा आणि नको असलेल्या चपला फेकून द्या.
दाराच्या तोंडाची चपलांचा ढीग - दारात चपलांचा ढीग पडलेला असणं खराब तर दिसतंय शिवाय त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ लागतात. घराचं दार हे वास्तुशास्त्रात महत्त्वाचे मानले जाते, जीवनातील संधींचेही ते प्रवेशद्वार असते. त्यामुळे ते स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे खूप महत्वाचे आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2025 11:31 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shoe Rack Direction: घराची प्रगती थांबते, नवीन काहीच घडत नाही; चपला ठेवण्याची जागा इतका परिणाम करते









