Money Signature: तुम्ही पण अशी सही करत असाल तर ग्रेट! पैसा बिलकूल कमी पडत नाही, हाताला यश

Last Updated:

Money Signature: तुमची सही संपत्ती आकर्षित करणारी नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमवले तरी तुमचा बँक बॅलन्स वाढत नाही. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की, काही लोक कमी पगारावरही जास्त संपत्ती जमवतात, तर काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवूनही

News18
News18
मुंबई : आपण सही कशी करतोय, याचा आपल्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तुमची सही तुमच्या आर्थिक कमाईशी थेट जोडलेली आहे. तुमची सही संपत्ती आकर्षित करणारी नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमवले तरी तुमचा बँक बॅलन्स वाढत नाही. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की, काही लोक कमी पगारावरही जास्त संपत्ती जमवतात, तर काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवूनही संपत्ती साठवण्यात अपयशी ठरतात. आपली सही संपत्ती आकर्षित करणारी असायला हवी, तशी नसेल तर थोडे बदल करू शकता. तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या सह्या कोणत्या प्रकारच्या असतात जाणून घेऊया.
श्रीमंत बनवणाऱ्या सह्या कशा असतात -
स्वाक्षरी ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या सह्यांमध्ये चार प्रकारचे चिन्ह असतात ते भरपूर संपत्ती कमावतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ज्यांच्या ज्यांच्या सही 'मनी माऊंटन' असतो त्यांना आर्थिक अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे, ज्यांच्या स्वाक्षरीमध्ये 'मनी बॅग' तयार होते ते देखील श्रीमंत असतात. याव्यतिरिक्त, ज्यांच्या स्वाक्षरीमध्ये पैशाचा त्रिकोण किंवा 'मनी बाऊल' असतो त्यांना देखील श्रीमंत मानले जाते. याविषयी जाणून घेऊ.
advertisement
मनी माऊंटन - ज्यांच्या सहीमध्ये मनी माऊंटन तयार होतो, त्यांच्या सहीमध्ये संपत्ती आकर्षित करण्याची क्षमता असते. सही करताना त्यात मनी माऊंटन नीट येत असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, जर तुमचे नाव M ने सुरू होत असेल किंवा त्यात M असेल, तर M अशा प्रकारे काढावे की ते डोंगरासारखे दिसेल.
advertisement
मनी बॅग - सही करताना तुम्ही त्यात मनी बॅग तयार करण्याची सवय लावल्यास तुमच्याकडे नेहमीच पैशांचा प्रवाह स्थिर राहील. तुमचे पैसे निरुपयोगी गोष्टींवर खर्च होणार नाहीत. श्रीमंत लोकांच्या सहीत अनेकदा मनी बॅग पाहायला मिळते. उदाहरणार्थ, तुमच्या नावातील एक अक्षर Y, G, J, P, L, किंवा इतर कोणतेही अक्षर जे लिहिताना एक मोठं वळण घ्यावं लागतं. गोलाकार मनी बॅग तयार व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या सहीमध्ये मनी बॅग तयार करून फायदा घेऊ शकता.
advertisement
मनी बाऊल - ज्या लोकांच्या स्वाक्षरीमध्ये मनी बाऊल तयार होतो, त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो, असे मानले जाते. संपत्ती जमा करण्यात हे लोक येशस्वी होतात. मनी बाऊल माणसाला श्रीमंत बनवतो.
पैशाचा त्रिकोण (धन त्रिकोण) - काही लोक सही करताना अक्षरे अशा प्रकारे लिहितात, त्यातून धन त्रिकोण तयार होतो. सहीत धन त्रिकोण तयार होणं म्हणजे तुमचे आर्थिक व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. पैशांच्या आघाडीवर असे लोक भक्कम असतात; असे लोक आपल्या कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनाद्वारे यश मिळवतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Money Signature: तुम्ही पण अशी सही करत असाल तर ग्रेट! पैसा बिलकूल कमी पडत नाही, हाताला यश
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement