Nag Panchami 2025: इच्छाधारी नाग-नागिणीचं रहस्य! मानेंद्रगडावर खरंच तसे स्त्री-पुरुष दिसतात का?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Nag Panchami 2025: धार्मिक कथांमध्ये सापांचे वर्णन खूप शक्तिशाली आणि चमत्कारिक असे केलं आहे. अशाच काही कथांमध्ये इच्छाधारी नाग आणि नागिनचा उल्लेख आहेत.
मुंबई : भारतात नाग-सापांची पूजा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. दरवर्षी नागपंचमीला लोक सर्पदेवतेला दूध अर्पण करून त्यांची पूजा करतात. रामायण आणि महाभारतासारख्या जुन्या कथांमध्ये सापांचा उल्लेख अनेकदा आला आहे. धार्मिक कथांमध्ये सापांचे वर्णन खूप शक्तिशाली आणि चमत्कारिक असे केलं आहे. अशाच काही कथांमध्ये इच्छाधारी नाग आणि नागिनचा उल्लेख आहेत.
छत्तीसगड राज्यातील मानेंद्रगड भागात एक गुहा आहे, त्या गुहेला स्थानिक लोक "नाग गुफा" म्हणून संबोधतात. येथील लोकाचं म्हणणं आहे की, त्यांनी रात्रीच्या वेळी अनेक वेळा माणसांसारखे दिसणारे विचित्र प्राणी पाहिले आहेत, ते नंतर सापांमध्ये रूपांतरित झाले. गावातील ज्येष्ठ नागरिक, वडीलधारे लोक सांगतात की त्यांच्या पूर्वजांनीही अशा घटना पाहिल्या आहेत. इच्छाधारी नाग आणि नागिन होते, यावर त्यांचाही विश्वास होता. नाग किंवा नागिन मारला जातो तेव्हा त्यांचा जोडीदार मानवी रूप धारण करून बदला घेतो, असेही येथील लोकांचे म्हणणे आहे.
advertisement
धार्मिक श्रद्धेनुसार पाहायला गेल्यास अशा गोष्टी फक्त छत्तीसगडपुरत्या मर्यादित नाही. भारतातील अनेक राज्यांमध्ये इच्छाधारी नाग-नागिणीच्या कथा ऐकायला मिळतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की, हिमालयाच्या वरच्या भागात आणि काही घनदाट जंगलात अजूनही असे रहस्यमय साप आहेत.
advertisement
पण वैज्ञानिकदृष्ट्या यामध्ये जराही तत्थ नाही. शास्त्रज्ञांच्या मते या सर्व फक्त कथा आहेत. असा कोणताही प्राणी नाही जो आपले रूप बदलू शकतो किंवा इच्छेनुसार मानव बनू शकतो. साप हा एक प्राणी आहे जो त्याच्या प्रवृत्तीनुसार वागतो. त्याचे जीवनचक्र, पुनरुत्पादन आणि निसर्गातील स्थान या सर्व गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या निश्चित केल्या आहेत. रूप बदलणे यासारख्या गोष्टी केवळ कल्पना असून त्या सिद्ध करता येत नाहीत.
advertisement
तरीही, इच्छाधारी नाग-नागिणीच्या कथांचा समाजावर खोलवर परिणाम होतो. अनेकांना त्याविषयी आकर्षण आहे, असा कथा वाचणं रोमांचित अनुभव देतात. या गोष्टी समाजात लोककथांचा एक भाग बनल्या आहेत. इच्छाधारी नाग आणि नागिनच्या कथा खऱ्या नसतील, परंतु लोकांच्या श्रद्धा आणि श्रद्धेने त्या जिवंत ठेवल्या आहेत. एकंदरीत विज्ञानाच्या दृष्टीने इच्छाधारी नाग आणि नागिन अस्तित्वात नाहीत, परंतु भारतीय संस्कृती आणि कथांमध्ये त्यांचे नेहमीच स्थान असेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 7:50 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Nag Panchami 2025: इच्छाधारी नाग-नागिणीचं रहस्य! मानेंद्रगडावर खरंच तसे स्त्री-पुरुष दिसतात का?


