असा योग पुन्हा येणे नाही! नोव्हेंबरमध्ये पाच ग्रह चाल बदलणार, या राशींच्या श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार

Last Updated:

Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. या बदलांचा प्रभाव १२ पैकी काही राशींवर विशेषरित्या पडतो.

astrology news
astrology news
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. या बदलांचा प्रभाव १२ पैकी काही राशींवर विशेषरित्या पडतो. नोव्हेंबर २०२५ महिना नुकताच सुरू झाला असून, या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या गतीत मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ शुभ, तर काहींसाठी नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे.
नोव्हेंबर महिन्यातील ग्रहस्थितीतील मोठे बदल
पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल, तर २६ नोव्हेंबर रोजी तो वृश्चिक राशीत जाईल. त्याचबरोबर १० नोव्हेंबर रोजी बुध वक्री होईल आणि नंतर २३ नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करून २९ नोव्हेंबरला मार्गी होईल. ११ नोव्हेंबर रोजी गुरू ग्रह कर्क राशीत वक्री, तर २८ नोव्हेंबर रोजी राणी देव मार्गी होईल. याशिवाय, १६ नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या सर्व बदलांचा एकत्रित परिणाम तीन राशींवर विशेष स्वरूपात होईल.
advertisement
वृश्चिक राशी
नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रगती देणारा ठरेल. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, अडकलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी घडतील आणि घरगुती वातावरण आनंदी राहील. या काळात काहींना कौटुंबिक कार्यक्रम,सण, विवाह किंवा शुभ प्रसंगांचा आनंद मिळू शकतो.आरोग्य उत्तम राहील आणि तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. एकंदरीत, हा महिना तुमच्या आत्मविश्वासाला नवा उजाळा देणारा ठरेल.
advertisement
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. शुक्र आणि बुध दोन्ही तुमच्या राशीत लाभदायक स्थितीत असतील. त्यामुळे भाग्याची साथ मिळेल, प्रतिष्ठा वाढेल आणि सामाजिक वर्तुळात ओळख निर्माण होईल. या काळात नवीन करार, व्यवसायातील वाढ, नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ यांसारख्या संधी मिळू शकतात. नातेसंबंधात गोडवा येईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. काहींना नवीन कमाईचे मार्ग किंवा गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. एकंदरीत, नोव्हेंबर महिना तूळ राशीच्या लोकांसाठी नाव, मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा काळ ठरू शकतो.
advertisement
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना सकारात्मक बदलांचा आणि प्रगतीचा काळ ठरेल. दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळेल. करिअरमध्ये घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल, तर व्यवसायिकांसाठी हा मोठा धनलाभ आणि प्रगतीचा काळ ठरू शकतो. घरात शांतता आणि स्थिरता राहील. पालकांचा आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.काहींना प्रवासातून लाभ मिळू शकतो.मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून,तुम्हाला आत्मविश्वास आणि मानसिक समाधान मिळेल.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
असा योग पुन्हा येणे नाही! नोव्हेंबरमध्ये पाच ग्रह चाल बदलणार, या राशींच्या श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement