#Numerology: या जन्मांकाच्या लोकांनी सरकारीऐवजी खासगी नोकरीला प्राधान्य द्यावं
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Pooja Jain
Last Updated:
Numerology Marathi: 9 हा अंक नसलेल्या व्यक्तींकडे व्यवस्थापन कौशल्य चांगलं नसतं. तसंच या व्यक्ती प्रशासकीय काम चांगलं करू शकत नाहीत. सरकारी संस्थेत कामाऐवजी त्यांनी खासगी संस्थेत कामाला प्राधान्य द्यावं. या व्यक्तींनी..
# अनुपस्थित असलेल्या अंकांचा जीवनावर प्रभाव
#missing no. 9 : 20व्या शतकात जन्मलेल्या व्यक्तींच्या जन्मतारखेत 9 हा अंक नसण्याची शक्यताच नाही; पण 21व्या शतकात जन्मलेल्या अनेक व्यक्तींच्या जन्मतारखेत 9 हा अंक नाही. 9 हा अंक नसलेल्या व्यक्ती इतरांच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष करतात. इतरांच्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल या व्यक्ती थंड असतात. म्हणजेच त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. या व्यक्तींनी स्वतःला झोकून देऊन वागणं, तसंच मानवतावाद या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. 9 अंक जन्मतारखेत नसलेल्या व्यक्तीचं एक उदाहरण इथे देत आहोत.
advertisement
जन्मतारीख 23 एप्रिल 2003
9 हा अंक नसलेल्या व्यक्तींकडे व्यवस्थापन कौशल्य चांगलं नसतं. तसंच या व्यक्ती प्रशासकीय काम चांगलं करू शकत नाहीत. सरकारी संस्थेत कामाऐवजी त्यांनी खासगी संस्थेत कामाला प्राधान्य द्यावं. या व्यक्तींनी जोखमीच्या लाँग ड्राइव्हवर जाणं टाळावं. जुगारासारख्या व्यसनांपासून या व्यक्तींनी दूर राहावं. या व्यक्तींनी कायम शारीरिक व्यायाम करावा. अन्यथा त्यांना डिप्रेशन येऊ शकतं. त्यांची जीवनशैली खर्चिक असते. त्यात बदल करण्यास खूप वाव असतो. पार्टनरशिप करायची असल्यास त्याचे फायदे आणि तोटे कोणते असू शकतील, याचा विचार या व्यक्तींनी आधी करावा. कारण त्यातून बराच वाद उद्भवू शकतात. या व्यक्तींनी कायम लाल रंगाच्या कुटुंबातल्या रंगाचे कपडे घालावेत. त्यामुळे 9 या अंकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंगळ ग्रहाची शक्ती मिळू शकेल.
advertisement
9 या अंकाच्या शक्तीचा प्रभाव वाढवण्यासाठी
- मोबाइल नंबरमध्ये 9 आणि 6 हे अंक असावेत.
- मोबाइल नंबर असा घ्यावा, की त्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज 9 होईल.
- आश्रमात लाल मसूर दान करावेत.
- भगवान शिवशंकरांना दुधाचा अभिषेक करावा आणि प्रत्येक मंगळवारी हनुमानाला कुंकू वाहावं.
advertisement
- ऑफिसच्या टेबलवर लाल मेणबत्त्या ठेवाव्यात.
- बॅगेमध्ये कायम लाल हातरुमाल ठेवावा.
- वर्षातून किमान एकदा तरी मंगळ ग्रहाचे विधी करावेत किंवा मंगळाची पूजा करावी.
- या व्यक्तींनी मांसाहार टाळावा. मद्यपान करू नये. तंबाखू खाऊ नये. तसंच, या व्यक्तींनी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2023 6:30 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
#Numerology: या जन्मांकाच्या लोकांनी सरकारीऐवजी खासगी नोकरीला प्राधान्य द्यावं