Saphala Ekadashi 2025: 14 कि 15 डिसेंबरला सफला एकादशी; उत्तम आरोग्य, संपत्तीसाठी करतात या गोष्टी

Last Updated:

Saphala Ekadashi 2025: सफला एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीची कार्ये सफल होतात आणि श्रीहरींच्या कृपेनं भौतिक सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी केलेले सर्व आध्यात्मिक प्रयत्न सिद्धी देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत धन, व्यापार, नोकरी आणि संतती संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ देते.

News18
News18
मुंबई : यंदाचा डिसेंबर महिना धार्मिकदृष्ट्या खास आहे, या महिन्यात तीन एकादशी आल्या आहेत. त्यातील पहिली झाली असून दुसरी सफला एकादशी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशीला तिथीला साजरी केली जाते, सफला एकादशीचं व्रत आयुष्य वाढवण्यासाठी आणि आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. सफला एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीची कार्ये सफल होतात आणि श्रीहरींच्या कृपेनं भौतिक सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी केलेले सर्व आध्यात्मिक प्रयत्न सिद्धी देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत धन, व्यापार, नोकरी आणि संतती संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ देते.
सफला एकादशी कधी आहे?
सफला एकादशी तिथी 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:49 वाजता सुरू होत असून ही तिथी 15 डिसेंबर रोजी रात्री 9:19 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, या वर्षी सफला एकादशीचे उपवास आणि पूजा 15 डिसेंबर रोजी करणे योग्य ठरेल.
सफला एकादशीला श्रीहरींची पूजन विधी -
सफला एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी भगवान विष्णूंची पूजा करा. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा किंवा गोपी चंदनाचा टिळा लावा. श्रीहरींना पंचामृत, ताजी-हंगामी फळे अर्पण करा. देवाला तुळशीची पाने अर्पण करण्यास विसरू नका. थंडीचा काळ असल्यानं दान म्हणून या दिवशी स्वेटर-ब्लँकेट अशा गोष्टी आणि अन्नदान करण्याचे विशेष फळ मिळते.
advertisement
सफला एकादशीचे उपाय
1. उत्तम आरोग्यासाठी
चांगल्या आरोग्यासाठी श्रीहरींना हंगामी फळे अर्पण करा, 108 वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. ही फळे प्रसाद म्हणून ग्रहण करा. या प्रसादाने रोगी व्यक्तीही आरोग्य लाभ मिळवू शकते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आयुष्य, आरोग्य आणि वैभवाचा आशीर्वाद मिळतो.
advertisement
2. धन-संपत्तीच्या प्राप्तीसाठी
आर्थिक अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांनी दररोज सकाळी पाण्यात लाल फूल टाकून सूर्य देवाला अर्पण करा. सायंकाळी पूजास्थानी तुपाचा चारमुखी दिवा लावा. असे केल्याने आर्थिक कार्य लवकर पूर्ण होतात, असे मानले जाते.
advertisement
3. कुटुंबाच्या रक्षणासाठी
श्रीहरींना रेशमाचा पिवळा धागा अर्पण करा. त्यानंतर हा धागा हातात घेऊन 108 वेळा ‘रां रामाय नमः’ मंत्राचा जप करा. यानंतर पुरुषांनी हा धागा आपल्या उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात बांधावा. हा उपाय कुटुंबाचे संरक्षण आणि एकता वाढवण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Generated image
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Saphala Ekadashi 2025: 14 कि 15 डिसेंबरला सफला एकादशी; उत्तम आरोग्य, संपत्तीसाठी करतात या गोष्टी
Next Article
advertisement
ZP Election Municipal Elections : निवडणुकांचा डबल बार उडणार! निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट, महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
  • निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?

  • निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?

  • निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?

View All
advertisement