Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी 15 की 16 ऑगस्टला? बाळ-गोपाळाच्या पूजेसाठी फक्त 43 मिनिटं मुहूर्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Janmashtami 2025: मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्म जन्मकाळ उत्सव सुरू होतो. बाळगोपाळाच्या मूर्तीला पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) आणि नंतर पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्रे, दागिने, मुकुट आणि बासरी घालून सजवले जाते.
मुंबई : श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता, असे मानले जाते. यामुळेच जन्माष्टमी मध्यरात्री साजरी करण्याची परंपरा आहे. बाळणा बांधून मध्यरात्री कृष्णाची पूजा केली जाते. यंदाच्या जन्माष्टमीविषयी सविस्तर जाणून घेऊ.
श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२५ कधी आहे?
पंचांगानुसार, श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच जन्माष्टमी तिथी १५ ऑगस्ट रोजी रात्री ११:४९ ते १६ ऑगस्ट रोजी रात्री ९:३४ पर्यंत असेल. म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी १५ ऑगस्ट रोजी शनिवारी रात्री साजरी केली जाईल.
जन्माष्टमी कशी साजरी करतात?
श्रीकृष्णाचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि मध्यरात्री कृष्ण जन्मकाळाची वाट पाहतात. घरातील देव्हाऱ्यात श्रीकृष्णाच्या पाळण्याची सजावट केली जाते. मंदिरांमध्येही सामूहिक जन्माष्टमी साजरी करतात.
advertisement
मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्म जन्मकाळ उत्सव सुरू होतो. बाळगोपाळाच्या मूर्तीला पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) आणि नंतर पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्रे, दागिने, मुकुट आणि बासरी घालून सजवले जाते. बाळगोपाळाची आरती करून "गोविंदा रे गोपाळा" किंवा अन्य भजने गाऊन आनंद व्यक्त करतात. श्रीकृष्णाला लोणी, लाडू किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी प्रसाद वेगवेगळ्या पद्धतीनं अर्पण करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी 'गोपाळकाला' किंवा 'दहीहंडी'चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
advertisement
पाळण्यासाठी लागणारे साहित्य -
सुंदर फुलांनी आणि रंगीबेरंगी वस्तूंनी सजवलेला पाळणा हवा. श्रीकृष्णाची लहान, सुंदर मूर्ती, पाळण्यात ठेवण्यासाठी. मूर्तीला घालण्यासाठी नवीन वस्त्रे, मोरपीस, मुकुट आणि दागिने. नैवेद्यासाठी लोणी, लाडू- मिठाई, फळे आणि पंचामृत. याशिवाय फुले, तुळशीची पाने, धूप, दीप, अगरबत्ती, कापूर.
advertisement
जन्माष्टमी पाळणा विधी - मध्यरात्री १२ वाजण्यापूर्वी, बाळगोपाळाच्या मूर्तीला पंचामृताने आणि नंतर पाण्याने स्नान घालतात. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्रे आणि दागिने घालून सजवतात. कृष्ण जन्माचा अचूक क्षण आल्यावर, म्हणजेच मध्यरात्री १२ वाजता, मूर्तीला मोठ्या प्रेमाने आणि आदराने सजवलेल्या पाळण्यात ठेवले जाते. मूर्ती पाळण्यात ठेवल्यावर घरातील सर्वांनी किंवा मुलांनी मिळून पाळणा हलवावा. या वेळी 'गोविंदा रे गोपाळा' किंवा अन्य भजने मोठ्या उत्साहाने गायली जातात. आरती झाल्यावर प्रसाद वाटला जातो आणि उपवास केलेल्या भक्तांनी प्रसाद ग्रहण करून आपला उपवास सोडतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 10:49 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी 15 की 16 ऑगस्टला? बाळ-गोपाळाच्या पूजेसाठी फक्त 43 मिनिटं मुहूर्त


