Morning Mantra: दिवसाची सुरुवात या 5 मंत्रांनी करण्याचे फायदे अनेक; संपूर्ण कामावर दिसून येतो प्रभाव
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Morning Mantra: धार्मिक श्रद्धेनुसार मंत्र जप केल्यानं व्यक्तिच्या जीवनात सकारात्मक परिणाम मिळू लागतात. सकाळी मंत्राचा जप केल्यानं संपूर्ण दिवस शुभ आणि यशस्वी होऊ शकतो. शिवाय, या मंत्रांचा नियमित जप केल्यानं देवी लक्ष्मीचे आशीर्वाद पाठिशी राहतात. या विशेष मंत्रांविषयी माहिती करून घेऊया.
मुंबई : देवाच्या नामस्मरणात एक वेगळीच ताकद आहे. सकाळी उठल्यावर मंत्रांचा जप करणं खूप शुभ मानलं जातं. याचा आपल्या मनावर, आरोग्यावर, आचरणावर चांगला परिणाम होतो. हिंदू धर्मात विविध मंत्रांचा उल्लेख असून मंत्र जप करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. धार्मिक श्रद्धेनुसार मंत्र जप केल्यानं व्यक्तिच्या जीवनात सकारात्मक परिणाम मिळू लागतात. सकाळी मंत्राचा जप केल्यानं संपूर्ण दिवस शुभ आणि यशस्वी होऊ शकतो. शिवाय, या मंत्रांचा नियमित जप केल्यानं देवी लक्ष्मीचे आशीर्वाद पाठिशी राहतात. या विशेष मंत्रांविषयी माहिती करून घेऊया.
‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थितो ब्रह्मा, प्रभाते करदर्शनम्’
सकाळी उठताच, प्रथम दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडून त्याकडे पाहा आणि या मंत्राचा 3 किंवा 7 वेळा जप करा. जप केल्यानंतर हात तुमच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर हलक्या हाताने फिरवा. असे केल्याने देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि भगवान ब्रह्मा यांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते.
advertisement
‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्॥’
सकाळी स्नान केल्यानंतर, स्वच्छ कपडे घालावे आसनावर किंवा चटईवर बसा. नंतर रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेने या मंत्राचा 11, 27 किंवा 108 वेळा जप करा. या मंत्रामध्ये वेगळीच जादू आहे. आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा काढण्याची यामध्ये ताकद आहे. या मंत्राने बुद्धिमत्ता वाढवते आणि संपूर्ण दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला राहतो.
advertisement
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’
सकाळी तुळशीच्या माळेने श्री हरी विष्णूचा '‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’' हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. यामुळे मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो, जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात सुख आणि शांती राहते.
advertisement
‘ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा॥’
धार्मिक श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे घरात समृद्धी आणि आशीर्वाद देखील वाढतात. सकाळी स्फटिकाच्या माळेने हा मंत्र 21 किंवा 108 वेळा जप करावा.
‘ओम’
‘ओम’ चा जप करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा मंत्र जपला पाहिजे. तो मन शांत करतो, एकाग्रता वाढवतो, ताण कमी करतो आणि संपूर्ण शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 7:39 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Morning Mantra: दिवसाची सुरुवात या 5 मंत्रांनी करण्याचे फायदे अनेक; संपूर्ण कामावर दिसून येतो प्रभाव









